सोनेखारी येथे हल्दी कुंकू ( वाण वाटप ) तिळसंग्रात नारीशक्ती बिरसा फायटर्सचा स्तुत्य उपक्रम

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

नवेझरी/तिरोडा (१७जाने)  तिळसंग्रात उतरार्धात तिसर्‍या दिनी हल्दी कुंकू कार्यक्रम आदिवासी नववर्ष निमित्त हा अनोखा महोत्सव नारीशक्ती बिरसा फायटर्स समितीच्या वतीने आयोजीत करण्यात आला होता.


कार्यक्रमात राणी दुर्गावती समितीने नृत्यात वाजत गाजत व उखाने तसेच हल्दी कुंकू (वाण वाटप) वाटप करून महिलांनी कार्यक्रम संपन्न केला.


याप्रसंगी (अध्यक्षा) माधुरी कुंभरे, आशा इळपाते (उपाध्यक्षा), माधुरी धुर्वे (कोषाध्यक्ष), माधुरी इळपाते (सचिव), नगीना धुर्वे, यांच्या प्रमुख उपस्थीतीत हल्दी कुंकवाचा कार्यक्रम पार पाडला. 


प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक महिला वडाचे झाड व सभोवती गोंडी झेंड्याजवळ कार्यक्रम आनंदाने पार पडला.





Post a Comment

0 Comments

झाले