धुळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मा.डॉ.महेश मोरे साहेब यांच्यावरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा...

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




गुलाब सोनवणे, आदिवासी एकता परिषद

धुळे:-  धुळे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मा.डॉ.महेश मोरे साहेब यांच्यावर जो कट- कारस्थान करून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो तात्काळ मागे घेऊन दोषी महानगर पालीकेच्या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी  करून कार्यवाही करण्यात यावी. याबाबत मा.तहसीलदार साहेब शिंदखेडा यांना आज दि.18/01/2022 रोजी आदिवासी एकता परिषद व आदिवासी टाईगर सेना यांच्यावतीने  निवेदन देण्यात आले.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, महानगरपालिका धुळे येथील बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणातील खरे दोषींवर राजकीय दबावापोटी अटक न करता आदिवासी समाजाचे प्रामाणिक आरोग्य अधिकारी मा. डॉ. महेश मोरे यांना जातीय राजकारणापोटी तसंच वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी लसीकरण अधिकारी यांच्यावर राजकीय हस्तक असल्या कारणाने त्यांना सदर गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. असे गलिच्छ राजकारण पोलीस प्रशासनाला हाताशी धरून करण्यात आले आहे. हे कायदा व सुव्यवस्थेसाठी धोक्याचे आहे. 




आरोग्य अधिकारी हे आदिवासी समाजाचे असल्याने जातीयवाद्याकडून संगतमताने आदिवासी अधिकाऱ्याला संपवण्यासाठी हा सर्व खेळ रचल्याचे  नागरिकांमध्ये चर्चा आहे.


म्हणून पोलीस चौकशी मध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचं हस्तक्षेप न होऊ देता तपास करणे आवश्यक आहे. मनोज मोरे हे वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांवर दबाव आणत आहेत ते तात्काळ बंद करून व पोलिसांना तशा सूचना देण्यात याव्यात, अन्यथा आदिवासी संघटनांकडून तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन जवाबदार राहील याची दखल घ्यावी.








Post a Comment

0 Comments

झाले