पिंडकेपार जिल्हा परिषद अपक्ष महिलाराज पंचायत समिती तिन्ही पुरूष तर पिंडकेपारमध्ये महिला
एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली:(२०जानेवारी) तालुक्यात जिल्हा परिषद निवडनुकीत काँग्रेसचे वर्चस्व तर भाजपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने साकोली विधानसभेत पंजाची✋ पकड असल्याची मतदार जनतेने दाखवून दिले.
पिंडकेपार क्षेत्रात योग्य उमेदवाराची निवड न केल्याने याचा फटका जास्त काँग्रेसला बसला व मागील सन २०१५ चे नंदुभाऊ समरित जिल्हा परिषद सदस्य यांच्या विकास आघाडीने गॅस सिलेंडरच्या रूपाने विजयाचा मार्ग तयार केला. एकहाती विजय मिळवून त्यांच्या पत्नी दिपलता नंदुभाऊ समरित (५१७८) यांनी आपली प्रतिद्वंदी मागील वेळच्या पं.स.सदस्या काँग्रेसच्या छाया तुळशीदास पटले (२६२७) यांचा २५५१ मोठ्या मतांधिक्यांने पराभव करीत पिंडकेपार क्षेत्रावर वर्चस्व निर्माण केले.
भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील विजय हा काँग्रेस व भाजपाच्या मताच्या बेरीजेपेक्षा मोठा होता व त्यांनी मिळविलेले मत लोकप्रिय व्यक्तीचीच ओळख असू शकतो असे जानकारांचे मत आहे. दोन्ही गणातील सदस्य निवडून आणले यावेळी विजयात सामिल बांधवां स पिंडकेपारयेथे मतदार बांधवां ना संबोधित करतांनी"आपले प्रेम पराकष्टा यामुळे आपले उमेदवार निवडून आले! कुठलीही पक्षाची रसद नसतांनी धनशक्ती विरोधात जनशक्तीनेच विजय मिळवून दिल असे मा जि प सदस्य नंदुभाऊ समरित यांनी म्हटले
त्यावेळी विजय उमेदवार सुशिल गणवीर, तर महिला उमेदवार सरिता लालचंद लंजे ह्यांनी सुध्दा मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांचे समर्थक हजर होते..

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार