आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
साकोली (24जानेवारी) वडेगांव ग्रामपंचायत सदस्य आनंदराव शि.राऊत यांचे निधन झाल्याने ग्रामपंचायत असलेल्या रिक्त जागेवर मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत जागेवर वडेगांव पदाधिकारी यांनी एकत्र बसुन एकच उमेदवार देवून आदर्श निर्माण केला व गावाचा पैसाही वाचविला.
यामुळे गावातील राजकीय बांधीलकी प्रेम अतूट राहीले. म्हणुन आज ग्रामपंचायत मासिक सभेत अविरोध, नवनियुक्त सदस्य दिनदयाल हरिदास राऊत यांचे स्वागत सरपंच समन्वयक सुरेश कुमार पंधरे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पुष्पगुच्छ देत नियुक्त सदस्य म्हणून स्वागत करण्यात आले.
यावेळी ज्योती वघारे सरपंच, जय देव कुरूळकर, बबिता तु मेश्राम, शोभा जगदीश कोचे, कौसल्याबाई लांजेवार, पद्मा प्रभुजी कापगते, व चंद्रशेखर भानारकर व सुखराम मेश्राम हे परिचर उपस्थीत होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार