आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
गुलाब सोनवणे शिंदखेडा, आदिवासी एकता परिषद तालुका सचिव
शिंदखेडा (दि.26 जानेवारी) :- आदिवासी एकता परिषद शिंदखेडा मार्फत क्रांतिवीर राॅबीनहुड तंट्या भिल यांची १६२ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळेस क्रांतिवीर राॅबिनहुड तंट्या भील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. प्रतिमापुजन सिताराम मालचे यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब फुले यांनी तरुणांना व्यसनापासून लांब राहावे व देश सेवेसाठी तत्पर राहावे असा संदेश दिला.
कार्यक्रमात तालुका सचिव गुलाब सोनवणे, सहसचिव भूपेंद्र देवरे, कार्याध्यक्ष दीपक फुले, सल्लागार आप्पा सोनवणे, सहसल्लागार शानाभाऊ सोनवणे, शंकर मोरे, एकनाथ भिल, अजय मालचे, अनिल पिंपळे, गणेश सोनवणे, सुनील मोरे, भुरा सोनवणे, मोतीराम सोनवणे, नाना फुले, राजू पवार, अभय भिल, दयाराम सोनवणे, बापू मालचे, जिभाऊ फुले, मच्छिंद्र भिल, विकी चित्ते व इतर आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार