आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
प्रतिनिधी:- गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हाध्यक्ष नंदुरबार पत्रकार
शिरपूर:- आज दि.३ जानेवारी २०२२ रोजी दि.न पाडवी माध्यमिक विद्यालय, कोडीद येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात आली व मुलामुलींना लसीकरणाबद्दल समुपदेशन करण्यात आले.
यावेळी आरोग्य उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हिरा पावरा, शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी.टी. बडगुजर सर, ज्येष्ठ शिक्षक, श्री.जे झेड पावरा, श्री.सनेर सर, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्टक ज्योती पावरा, आशासेविका अलका पाटील, वंदना पावरा, तारकी पावरा, शिक्षिका श्रीमती एस.के. खैरे, श्रीमती एफ.आर. पाटील श्री. बी वाय मोरे सर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
उपकेंद्र कोडीद अंतर्गत डी.न.पाडवी हायस्कूल कोडीद ता शिरपूर जि धुळे येथील वयोगट १५+ कोवीड-१९ लसीकरण स्थळी मार्गदर्शन करतांना उपकेंद्र, कोडीद आरोग्य टीम...

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार