प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद ऑनलाइन गुगलमीट द्वारे संपन्न.

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना  

नंदुरबार दि.२८ शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. खालील विषयावर माहिती सीआरजी सदस्य यांनी दिली. निपून भारत परिपत्रक वाचन अनुराधा गव्हाणे मॅडम, राज्यस्तरीय राबविले जाणारे उपक्रम माहिती आढावा विश्वास माळी सर, इंग्रजी साहित्य पेटी उजळणी प्रशिक्षण भागाची माहिती राजू मोरे सर, कृतीतून शिकूया विज्ञान उपक्रम विषयी माहिती प्रशांत भामरे सर व कैलास गव्हाणे सर, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्पर्धा व एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम विषयी माहिती किशोर महाले सर,१०० दिवस वाचन अभियान उपक्रम विषयी रामलाल पारधी सर, केंद्रातील शैक्षणिक गरजाधारीत विषयी माहिती रविंद्र पाटील सर, मागील शिक्षण परिषद आढावा प्रशासकिय कामकाजाची माहिती केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर सर यांनी माहिती दिली.


पिराॅमल फाऊंडेशनचे समन्वयक रमेश जानकर यांनी सांगितले की, शिक्षण प्रक्रिया अत्यंत व्यापक स्वरुपाची आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संपूर्ण शिक्षण प्रणाली त्याभोवती फिरली पाहिजे. आजच्या काळात शिक्षक सुविधादात्याच्या भूमिकेत असला तरी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असणे आवश्यक आहे. असेही मत व्यक्त केले. 


यावेळी शिक्षण परिषदला पिराॅमल फाऊंडेशनचे समन्वयक रमेश जानकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदींची उपस्थिती होती. 


प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी मार्गदर्शनपर म्हणाले की, प्रत्येक शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध व्हावे, पालकांची शिक्षणाबद्दलची अनास्था कमी होऊन एकूणच शिक्षण पद्धतीकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. आजचा काळ कठीण आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेसमोर विशेषत: शिक्षकांसमोरच नवी आव्हाने उभी राहिली आहेत. ही जबाबदारी पेलण्यासाठी शिक्षकांनी उर्जावान होणे आवश्यक आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार बदलत असताना नव्या संकल्पना आत्मसात करून कोविड-१९ काळात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी स्वत:चीही गुणवत्ता वाढविली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


शिक्षण परिषदेचे तांत्रिक सहाय्य गोकूळ लोहार सर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी सरांनी केले. उपस्थितांचे आभार ललीता वसईकर मॅडम यांनी मानले.




Post a Comment

0 Comments

झाले