आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
सक्षम भारतासाठी गावे निर्मल केल्यास महामारीवर विजय मिळवू:- सुरेशकुमार पंधरे, अध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ
एसके जी.पंधरे-राज्य पञकार प्रतिनिधी
तिरोडा (३०जाने) बरबसपुरा येथे धरतीआबा बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केले असता त्यावेळी मंचकावर प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटक विदर्भ जनरल सेक्ररेटरी शामराव जी. उईके, प्रमुख अतिथी भोजराज उईके जिल्हा अध्यक्ष गोंदिया राकेश कुंभरे, ता.अध्यक्ष, तिरोडा, वसंता मडावी संपर्क ता.प्रमुख, नवनियुक्त जिल्हा महिला संरक्षक मिना सयाम, मा.जि.सदस्या, मुन्ना जी सलामे जिल्हा सल्लागार, नरेश जी असाटी सरपंच बरबसपुरा, प्रकाश कोकोडे, जितेंद्र वल्के युवा प्रतिनिधी, तसेच गावातील प्रमुख वक्ते यावेळी हजर होते.
या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून सुरेशकुमार पंधरे "आदिवासी मानव जीवन व पर्यावरणाचा लाखो वर्षाचा संबंध असल्याचा निर्वाळा दिला व आज निर्माण झालेल्या भयावह परिस्थीला प्रशासन काय करत आहे काय नाही याचे संशोधनकरण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी राजकीय नेतॄत्वावर अवलंबून नसून आपणावर आहे सांगितले.
समाजबांधवाशी संवाद साधताना भौतिक विकासाकडून कल्याण कारी विकास, होतांना "पर्यावरणा ची हानी आणि प्रदुर्षणाचा प्रश्न, वातावरणातील बदल, ग्लोबल वार्मिंग या सारख्या जागतिक समस्या ह्या मानवाच्या निसर्गातील अतिरेकी हस्तक्षेपामुळे निर्माण झाल्यामुळे धारण करणारे, वैश्विक महामार्या, दॄष्काळ, नैसर्गिक आपत्ती ,अवकाळी पाऊस व अनियमित होत असलेली बुध्दीवादी व अहंकारी मानसाचा अतिरेकी हव्यासाभि- मुख निसर्गाला ओरबाडणारा विकास नेमका कोणत्या दिशेने जात आहे यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
स्वच्छता दूत संतगाडगेबाबा, क्रांतीज्योती साविञीबाई फुले, माता जिजाऊ, राणी दूर्गावती, शहिद महा मानव.बिरसा मुंडासारखे, जल जतन जंगलाचे रक्षकांनी धरती ला रक्तात माखुन स्वातंञ्य दिले. अशा लोकांची, विचारवादी सक्षम फौज आपल्याला संघटीत नवत युवकांनी ज्ञानी, मुनी बनवून देश सवारावे लागेल. तरच सक्षम व साक्षर भारत देश उभा राहील, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे " शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" असा सल्ला मनुवादाविरोधात लढण्याचे बळ शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक गुलामीतून मुक्तीसाठी लढण्याचे बळ ठरेल.
पक्ष पार्टीचे नेतेच जनतेचे हंते(खुनी) आहेत सुप्रिम निर्णयानंतर ओबिसी नेते नाहक मर्दपणाचा आव आणतात त्यांनीच आरक्षणाचा बळी पाडला. हे सांगत सुटले? बिंदुनियमावलीत बदल करून एस.सी, एस.टी आरक्षणाचे महा सरकारमधील जातीयवादी मानसिकता असले ली मंञी सरकार मध्ये अंधाधुंध निर्णय घेत आहेत.
आदिवासी जीवनात संस्कॄती, शिकण्याची व त्यांची जीवणात सांगड घालण्याची गरज आहे. आदिवासी निसर्गाच्या सानिध्यात राहतो. त्याग समता व न्याय हे आत्मसात करून निसर्ग नियमान जीवन जगत असतो. आदिवासी धर्मजीवन जगण्याचा मार्ग दाखव तो शाश्वत विकास शोधकाला आनंद, स्वस्थ, शांततामय जीवनातून आनंदकाचे शिखर गाठायचे असेल तर दसरथ मांझी सारखे जिद्दी आणि चिकाटीने पहाडाचा सिना फाडून वाट काढली पाहिजे. असे पंधरेनी अध्यक्षीय भाषणातून समाजाची व्यथा मांडली.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार