वडेगांव निर्मलग्राम पंचायत येथे ७३ वा जि. प. शाळा निर्धन वाघाये कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून ग्रामपंचायत सरपंच ज्योती वघारे तर सेवा संस्थेत अध्यक्ष भि. ई. मेश्राम यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

एसके.जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

साकोली (२६जानेवारी) तालुक्यातील विविध पुरस्कारप्राप्त वडेगांव ग्राम पंचायत येथे  जेष्ठ सरपंच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रतिनिधी मा. सुरेशकुमार पंधरे समन्वयक सरपंच परिषद मुंबई यांचे अध्यक्षतेखाली ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 


यावेळी भारत माता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बि.आर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले व ध्वजारोहन करण्यात आले.  


उपस्थित विविध संस्था पदाधिकारी तंटामुक्त समिती, शाळा समिती व शाळा एच एम. शिक्षक, ग्राम पंचायत सदस्य यांनी पूजन करीत ध्वजा रोहन सरपंच ज्योती अंकोश वघारे यांचे हस्ते फडकविण्यात आले. 


कोरोना नियमाचे काटेकोर पालन करून ध्वजाला सलामी देण्यात आली. व राष्ट्र गीताने सांगता करण्यात आली.


यावेळी उपस्थित जयदेव कुरूळकर, उपसरपंच, सचिव, एस एस हातझाडे, तलाठी, शरणागत साहेब, दिनदयाल राऊत, बबिता मेश्राम, कोकिला मेश्राम अंगणवाडी सेविका, मनिषा पंधरे आशा स्वंयसेविका, कौसल्या लांजेवार, पद्मा कापगते, हरिश्चंद्र कापगते ऑपरेटर, सुखराम मेश्राम परिचर पाणी पुरवठा, चंद्रशेखर भानारकर व गावातील प्रतिष्ठीत नागरिक हजर होते.

Post a Comment

0 Comments

झाले