आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
गोंडी संस्कृती गीतांनी सोनेखारी बिरसाभक्तांनी आदिम सांस्कृतिक कार्य केले- सुरेशकुमार पंधरे
एसकेजी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ
तिरोडा(४जाने):- सोनेखारी शाखेत साहित्यीक व विचारवंताच्या शब्दपुजन, गोंडी संस्कृती संस्कार पीठावर बिरसा भक्ताचा पेहराव कॅमेरात टिपल्याने युवकांनी रेणापाटा गीते विविध नृत्यप्रकारात रॅलीत ठेका दिला.
पाहूण्यांचे सुस्वागतम करीत "जय सेवा" व "जय गोंडवाणा" "एक तीर एक कमान, सभी आदिवासी एक समान" अशा घोषनांनी आसमंत दुमदुमला.
या मेळाव्याचे उदघाटक म्हणुन सुरेशकुमार पंधरे यांनी आपल्या भाषणात म्हटले, यामुळे आदिम संस्कॄतीचे दर्शन गोंडवाणा विचारसरणीला शोभून दिसतात कायद्याचे साम्राज्य आणुन आपण गावात आपले राज्य आणु शकता कारण, पेसा ॲक्ट व अनुसुची (५) पाच व (६) सहा अंतर्गत सर्व आपले खनिज संपत्ती व मोहफुल विक्रीचे अधिकार आपणास आहेत. त्या मुळे वनसमित्याचे अध्यक्ष व ग्राम समित्यांचे अधिकार आदिवासींना आहेत. हे लक्षात घ्या असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाध्यक्ष शामराव जी.उईके मा कृषी अधिकारी तथा सल्लागार जिल्हा गोंदिया यांनी सुध्दा बिरसा व संघटणशक्तीचे अधिकार क्षेञ कसे असतात यावर संभाषण केले.
रात्रीचा पाटा व संस्कृतीचे दर्शन गोटुल समिती भंडारा वस्तीगृहाच्या मुला-मुलींनी नृत्य केले.
यावेळी आदिवासी समाजाचे पदाधिकाऱ्यांसह नेते व बाहेरून आलेले जनसमुदाय उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार