प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश उद्यापासून शाळा १ ली ते ४ थी चे वर्ग सुरू.

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना  

नंदुरबार दि.३१ प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग सुरु करणेबाबत महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, खासदार डॉ.हिनाताई गावीत, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सिमाताई वळवी, जिल्हा प.उपाध्यक्ष ॲड.रामभैय्या रघुवंशी, शिक्षण सभापती अजितदादा नाईक, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ युनूस पठाण यांच्या कडे निवेदन देण्यात आले होते.


निवेदनाची प्रशासनाकडून दखल घेऊन संदर्भ शासन परिपत्रक क्र.संकीर्ण.२१ / प्र.क्र. १७८/ एसडी -६ दिनांक २० जानेवारी २०२२ कार्यालयाचे पत्र क्रमांक. जिपनं / प्रा.शि. / शा.सु .११/२०२२ दिनांक २३/०१/२०२२  संदर्भ क्रमांक १ अन्वये दिनांक २४ जानेवारी २०२२ पासून शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी चे वर्ग उपरोक्त संदर्भ क्रमांक २ अन्वये दिनांक २४/०१/२०२२ पासून सुरु करण्यात आले आहेत . 




तथापि , इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग असलेल्या शाळा मंगळवार दिनांक १/२/२०२२ पासून सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. 

  • शाळेची वेळ विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ अशी असेल
  • शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित रहावे. 
  • ज्या मोठ्या गावांमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी पालकांची संमती घेऊन शाळा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. 
  • शाळांमध्ये कोरोना बाधित शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आल्यास सदर शाळा ५ दिवस बंद ठेवावी. 
  • उपरोक्त संदर्भ क्रमांक १ च्या शासन परिपत्रकास संलग्न केलेले परिशिष्ट - अ व परिशिष्ट - ब बाबत काटेकोर पणे अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात यावी. 


शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियोजन करुन शालेय कामकाज कोव्हीड -19 च्या निर्देशाप्रमाणे सुरळीत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी.असेही आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण साहेब यांनी केले आहे. 

प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.



Post a Comment

0 Comments

झाले