बेकायदेशीर बांधकामाविरोधात विजय नागवेकर यांचे आमरण उपोषण

 



प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ

रत्नागिरी: गाव मौजे टेंभ्ये ता.जि.रत्नागिरी येथील सहहिस्सेदार यांची कोणतीही परवानगी न घेता कृष्णकांत केशव नागवेकर यांनी बांधलेल्या घराला अभय देण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत टेंभ्ये गटविकास अधिकारी पंचायत समिती रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी, सहाय्यक नगर रचनाकार कार्यालय रत्नागिरी ,तालुका निरिक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्या भोंगळ आणि पक्षपाती कारभाराच्या निषेधार्थ श्री. विजय नामदेव नागवेकर निवृत्त कर्मचारी सहाय्यक नगर रचनाकार कार्यालय रत्नागिरी यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद रत्नागिरी समोर आमरण उपोषण छेडले आहे. यापूर्वी श्री. विजय नागवेकर यांनी संबंधित कार्यालयाकडे असंख्य पत्रव्यवहार केला होता. परंतु संबंधित अधिकारी यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष केले व समाधान कारकही उत्तरं दिली नाहीत. सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असूनसुद्धा कार्यालयाने घरबांधणीस परवानगी का दिली?असा सवाल त्यांनी केला आहे.



 
         

उपोषण दरम्यान जिल्हा परिषद रत्नागिरी संबंधित अधिकारी यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु नेहमीप्रमाणेच टाळाटाळ करणारे पत्र सदर अधिकारी घेऊन आले. म्हणून त्यांनी त्यांचे पत्र घेण्यास नकार दर्शविला. सदर प्रकरणात राजकीय लोकांचा हात असल्यामुळे त्यामुळे आपल्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही, असा त्यांनी आरोप केला आहे. आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार करत विजय नागवेकर यांनी आपले आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे.






Post a Comment

0 Comments

झाले