कोडीद ता. शिरपूर जि. धुळे येथे एकदिवसीय योगासन शिबिर संपन्न!

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ


आज रोजी आरोग्य उपकेंद्र, कोडीद अंतर्गत कोडीद गावातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, जिल्हा परिषद केंद्र शाळा, दि.न.पाडवी माध्यमिक हायस्कूल कोडीद येथे एकदिवसीय योगासन शिबिर घेण्यात आले. शाळेतील मुलांना योगाचे महत्व सांगतांना डॉ. हिरा पावरा व योगगुरू श्री. तुषार शिवनेकर सर ह्यांनी सांगितले की, ह्या दगदगत्या जिवनमानात शारीरिक व मानसिक, बौद्धिक वृद्धीसाठी व सर्व प्रकारचे लहान मोठे विकार व मानसिक विकास ह्यासाठी "योगासन" हाच पर्याय आहे.




ह्याचावापर करून अनेक जागृत लोकांनी आपले आपले आयुष्मान वाढवले आहे. योगासाठी शहरांत हजारो रुपये खर्चीले जातात ही सत्यता नाकारता येत नाही म्हणून दैनंदिन जीवनात योगासन केल्यास सर्व प्रकारचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होतो ह्यावर सखोल मार्गदर्शन केले.


आरोग्य विभागाअंतर्गत योगशिक्षक श्री.तुषार शिवनेकर सर व उपकेंद्र, कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हिरा पावरा ह्यांनी आरोग्य उपकेंद्र कोडीद अंतर्गत एकदिवसीय विनामूल्य योगा शिबीर आयोजित केले.


ह्यावेळी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथील मुख्याध्यापक श्री.पाटील सर व शिक्षक वृंद, जिल्हा परिषद केंद्र शाळा येथील मुख्याध्यापक श्री. तापिराम पावरा सर व शिक्षक वृंद, दि.न.पाडवी माध्यमिक हायस्कूल येथील मुख्याध्यापक श्री.टी.टी.बडगुजर सर ह्यांचे सहकार्य लाभले.


सर्वांनी आरोग्य विभाग व योगशिक्षक श्री.तुषार शिवनेकर सर व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

झाले