आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
नाशिक:- जिल्ह्यातील आदिवासी मजूरांविरोधात लखमापूर (ता. बागलाण), तळवाडे (ता. मालेगाव), कजवाडे (ता. मालेगांव) यांसारख्या ग्रामपंचायतींनी असंवैधानिक रितीने ठराव पारित करुन, अत्याचारांची शृंखला चालवली होती, त्यासंबंधात मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद नाशिक) यांकडे तक्रार दाखल करुन संबंधीत ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक यांसह संबंधीतावर कायदेसंमत कारवाई होणेसाठी आदिवासी मित्र प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी लक्ष वेधले होते.
सदर तक्रारीची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मालेगांव व बागलाण गट विकास अधिकारी (BDO) यांना संबंधीत ग्रामपंचायतींची चौकशी व कारवाई चे लेखी आदेश काढले आहेत.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये, प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव, सटाणा यांनी आदिवासी जमातीच्या मुलभूत हक्क संवर्धनासाठी अर्ज कार्यालयास सादर केलेला होता.
त्यासंबंधीचे प्रत्र आज दि. ३१ जाने, २०२२ रोजी प्राप्त झाले.सदर पत्रान्वये खालील मुद्यांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींवर कारवाई होणेबाबत अर्ज सादर करण्यात आलेला आहे.
1. ग्रामपंचायत तळवाडे, ता. मालेगांव यांनी मजूरांच्या विरोधात दि. 19.12.2021 रोजी केलेला ठराव.
2. लखमापुर. ता. बागलाण येथील ग्रामस्थांनी गावातील आदिवासी मजूर महिलांना ग्रामपंचायतीसमार
केलेली मारहाण, अमानुष वागणूक.
3. कजवाडे. रामपुरा. ता. मालेगांव येथील ग्रामपंचायतीचा ठराव.
सदरची तक्रार ग्रामपंचायतींशी संबंधित असून, तक्रार अर्जावर तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी आपले ग्रामपंचायतीच्या संदर्भात तक्रारदार यांच्या अर्जातील नमूद मुद्यांच्या अनुषंगाने नियमोचित चौकशी विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) यांचे मार्फत करुन सात (07) दिवसांच्या आत चौकशी अहवाल निष्कर्ष व स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह सादर करावा. व चौकशी अहवालावरील निष्कर्षांनुसार उचित कार्यवाही करावी असा आदेश काढण्यात आला आहे.
जिल्ह्यातील आदिवासी मजूरांविरोधात लखमापूर (ता. बागलाण), तळवाडे (ता. मालेगाव), कजवाडे (ता. मालेगांव) यांसारख्या ग्रामपंचायतींनी असंवैधानिक रितीने ठराव पारित करुन, अत्याचारांची शृंखला चालवली होती, त्यासंबंधात मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद नाशिक) यांकडे तक्रार दाखल करुन संबंधीत ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक यांसह संबंधीतावर कायदेसंमत कारवाई होणेसाठी लक्ष वेधले होते. सदर तक्रारीची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मालेगांव व बागलाण गट विकास अधिकारी (BDO) यांना संबंधीत ग्रामपंचायतींची चौकशी व कारवाई चे लेखी आदेश काढले आहेत त्यासंबंधीचे प्रत्र आज दि. ३१ जाने, २०२२ रोजी प्राप्त झाले.
✒️ अमोल बाळासाहेब बच्छाव.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार