मुख्यमंत्री / गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा पत्रकार सतिश भालेराव प्रकरणी बिरसा फायटर्स / सोशल फोरमच्या वतीने निषेध !

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




पत्रकार सतिश भालेराव यांना  कायद्याचा धाक दाखवणाऱ्या जीवे  मारण्याची धमकी, शिविगाळ प्रकरणी पी आय  बळीराम परदशींना निलंबित करा 


एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 

साकोली(२४जाने) नागपूर जिल्हा  हिंगणा पत्रकार सतिश भालेराव यांचेशी हुज्जत घालणे, रस्त्यात  खोटी ३५३ कलम लावून कायद्याचे धाक दाखवून अश्लील जातीपातीची शिविगाळ करने, या मानसिकतेला व लोकशाहीला लाजिरवाणे करणाऱ्या कायद्याचा रक्षकच कसा भक्षक होऊ पाहणार्‍या कल्पकते विरूध्द "आई बहिनीची" शिविगाळ करणाऱ्या पोलिस निरीक्षक हिंगणा बळीराम परदेशीच्या निषेधार्थ व गुन्हा दाखल करण्याबाबत मान. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना साकोली तहसीलदार रमेशजी कुंभरे यांना सुरेशकुमार प़ंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ ब्युरो चिफ, सोबत महिला  उपाध्यक्षा लिला वासुदेव वल्के, कैलासजी गेडाम सोशल फोरम महासचिव, विजय साखरे, उपाध्यक्ष, सोशल फोरम, विलास मेश्राम शिवसेना उप-तालुका प्रमुख, मारोतीजी लांजेवार हे या निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.


निवेदनात नमूद माहितीनुसार दि. १७/१/२२ रोजी घटनेच्या दिवशी ॲट्रोसिटी पीडीत पत्रकार हे वॄत- संकलण करून जात असताना पी. आय. बळीराम परदेशी हिंगणा यांनी पत्रकारांचे काॅलर  पकडून जीवे मारण्याची धमकी दिली. हा लोकशाहीवरील हमला आहे. व पत्रकार हा लोकशाहीचा आधार स्तंभावरचा अमानवीय व गुलामीतून व संविधानविरोधी मानसिकतेला काळीमा फासणारी घटना आहे. 


अशा प्रकारे पोलीस विभागाला न शोभणारी घटना आहे. या निषेधार्थ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार विदर्भ संघा अंतर्गत निषेध नोंदविण्यात येत आहे.


भालेराव हे निर्भीड पत्रकार आहेत.  ते बौध्द समाजाचे असून सर्व समाजहितार्थात  वीर लढवय्या शिलेदार आहेत. 


विषमतेने पिसाळलेली माणसेच करीत असतात अशा अधिकाऱ्यावर कायद्याचा गैर वापर करीत आहेत. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. असे निवेदनात बिरसा फायटर्सच्या वतीने म्हटले आहे.


म्हणुन उच्च स्तरिय चौकशी करून संबंधीत बळिराम परदेशींना जातीवाचक शिविगाळ प्रकरणी निलंबित करावे या निषेधार्त व न्यायासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदय यांना आज दि. (२४जाने ) महाराष्ट्रातून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी सुध्दा सर्व पत्रकारांना संदेश दिला आहे.

Post a Comment

0 Comments

झाले