सोमपूर येथे टंट्यामामा भील जयंतीनिमित्त आरटीओ साहेबांच्या हस्ते प्रतिमा पुजन

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




सोमपूर,(वार्ताहर) सोमपूर येथील आदिवासी भील समाज सेवा बहुद्देशीय संस्थेमार्फत तसेच स्थानिक व परिसरातील आदिवासी बांधवांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तसेच आदिवासी क्रांतिकारक, ज्यांना त्याकाळातील ब्रिटिश सरकारने इंडीयन रॉबिनहूड ही पदवी बहाल केली होती असे महान क्रांतिकारक टंट्यामामा भील जयंतीनिमित्त मालेगाव येथील आरटीओ साहेब मा.विनोद जाधव साहेबांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.


तसेच जायखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्रीकृष्ण पारधी साहेबांनीदेखील टंट्यामामा भील व भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. 


यावेळी मा.जाधव साहेबांनी टंट्यामामा भील यांच्या संघर्षाची व बलिदानाचे थोडक्यात समाजबांधवांसमोर ऐतिहासिक पुरावा देत आपले मनोगत व्यक्त केले. 


मा.अंकुशे सरांनी देखील प्रतिमा पुजन करुन आपले मनोगत व्यक्त केले.  

     

तसेच यावेळी आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.प्रविण पवार सर, सचिव मा.मश्चिंद्र बोरसे सर प्रसिद्धीप्रमुख मा.आकाश पवार, जितु सोनवणे, अनिल गायकवाड, बली गायकवाड, सुनील गायकवाड, राजेंद्र मोरे, शिवाजी गायकवाड, भगवान गायकवाड, अक्षय गायकवाड, विश्वास गांगुर्डे, दादा ठाकरे, दिलीप माळी, दिपक सोनवणे, विलास सोनवणे आदींसह मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments

झाले