उपकेंद्र, कोडीद ता.शिरपूर येथे ‘मानवविकासमिशन_कार्यक्रम’ अंतर्गत गरोदर महिला, बालकांची तपासणी.!

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ

    

मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास कार्यक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यांत सुरू केला आहे. त्यात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले. याप्रमाणे प्राधान्याने कुपोषित बालके, कमजोर माता, गरोदर महिला यांची परिपूर्ण तपासणी,त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे, त्यानुसार उपचाराची सुविधा करणे अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव कऱण्यात आला आहे.



    

     

ह्यानुसार कोडीद येथे उपकेंद्र कोडीद येथे आज "मानव विकास मिशन कार्यक्रम' अंतर्गत उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र फत्तेपूर, उपकेंद्र मालकातर अंतर्गत ६० गरोदर माता व बालके ० ते ६ महिने मधील १६ व ६महिने ते २ वर्षांपर्यंत २६ असे एकूण ४२ बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.




     

ह्यावेळी स्रीरोग तज्ञ डॉ.हेमंत चौधरी, बालरोगतज्ञ डॉ. वाल्मीक पाटील, उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, उपकेंद्र कोडीद, उपकेंद्र मालकातर, उपकेंद्र फत्तेपूर येथील आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा वर्कर्स कर्मचारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी कॅम्प ठिकाणी उपकेंद्र कोडीद येथे उपस्थित होते.

   


ह्यावेळी उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी सगळ्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

झाले