पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी शर्ती तात्काळ रद्द करा,आदिवासी संस्थेमार्फत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




सटाणा :- (प्रतिनिधी) बागलाण तालुक्यातील आदिवासी भील समाज सेवा व बहुद्देशीय संस्थेमार्फत बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब मा.पांडुरंग कोल्हे साहेबांना पंतप्रधान आवास योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.


पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन समाविष्ट करण्यात आलेल्या अटींपैकी मोबाईल, दुचाकी, फ्रिज तसेच मासिक उत्पन्न दहा हजार असलेले कुटुंब घरकुलाचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरविण्यात येतील अशाप्रकरच्या अटी शासनाकडून नव्याने लागु केल्यामुळे जे गरजू लाभार्थी आहेत तेसुद्धा वंचित राहतील. कारण सध्या मोबाईल, दुचाकी या जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे त्या घरोघरी प्रत्येकाकडे पाहायला मिळतात, म्हणून अशा जाचक अटी त्वरित रद्द करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली. याविषयावर गटविकास अधिकाऱ्यांशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली.

 

यावेळी संस्थेमार्फत अध्यक्ष मा.प्रविण पवार सर सोमपूर, सचिव मा.मश्चिंद्र बोरसे सर, प्रसिद्धीप्रमुख आकाश पवार सचिन सोनवणे, हिरालाल गायकवाड, निलेश भोये आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले