वंचित बहुजन आघाडी तर्फे म्हाळदे शिवार कचरा डेपो येथील रहिवाश्यांच्या समस्या संदर्भात मालेगाव महानगर पालिकेला निवेदन

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




शशिकांत हिरामण पवार सर 

मालेगांव:- वंचित बहुजन आघाडी, मालेगांव शहर कडून जय मल्हार नगर म्हाळदे शिवार कचरा डेपो येथील रहिवाश्यांच्या समस्या संदर्भात मालेगाव महानगर पालिकेला निवेदन देण्यात आले.


येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची, लाईट, स्मशानभूमी व्यवस्था नसल्यामुळे मालेगाव महानगर पालिकेच्या  अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाची येत्या १५ दिवसांत दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.


यावेळी वंचित बहुजन आघाडी मालेगाव शहराध्यक्ष कैलासभाऊ लोहार यांच्या सोबत जय मल्हार नगरातील शाखा पदाधिकारी संतोष सोनवणे, भरत सकट, दिनेश सकट, सुनील लोंढे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

झाले