आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✒️डॉ.संजय दाभाडे सर , पुणे 9823529505 Dr. Sanjay Dabhade Sir
▪️रविवार , १६ जानेवारी २०२२.
स्टेट ( स्टेट - शासन संस्था ) गेली २५० वर्षे आदिवासींवर जंगल -; जमिनी हिसकावून घेण्यासाठी हल्ले करत आली आहे.
तिलका माझी, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे ह्यांनी तीव्र लढे दिले आहेत... आजही आदिवासींना लढणे भाग पडत आहेच.
आदिवासींवर नेहमीच कंपनी सरकारे जुलूम करत आली आहेत. आताही काल १५ जानेवारीला जगतसिंगपुर जिल्हा, धिंकिया गावं, ओडिशा इथे पोलिसांकडून आदिवासींवर भीषण हल्ला....९ ते ११ वर्षाच्या मुलांपासून वयो वृद्धांना सुद्धा प्रचंड मारहाण करण्यात आली. जिंदाल स्टील वेस्ट ( JSW) कंपनीला तिथं तब्बल ४५०० एकर जमीन हवी आहे....सरकार जबरदस्तीने तिथं प्लांट आणत आहे. सरकार नी भांडवलदार मिळून आदिवासींच्या जल जंगल जमीन ला उध्वस्त करू बघत आहेत. JSW च्या आधी तिथं posco घुसली होती. पण आदिवासींनी त्यास तीव्र विरोध केला. तिला ग्रीन ट्रीब्युनल ने देखील परवानगी नाकारली होती. त्यानंतर posco पळाली.
आता ओडिशा सरकारच्या आशीर्वादाने पुन्हा कंपनी राज सुरू होतय नी पोलिसांच्या बळाच्या जोरावर आदिवासींना दडपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे.
कितीही बळ वापरले तरी आदिवासींनी प्रखर संघर्ष सुरू ठेवत आजपर्यंत होता होईल तेवढी जल - जंगल- जमीन वाचवली आहे. परंतु ही संकटे व आक्रमणे कमी न होता वाढत चालली आहेत. तथाकथीत विकासाच्या नावाने हे सारे सुरू आहे.
संविधान मधील ५ व्या अनुसूचीत जल - - जमीन ह्यास संरक्षण मिळाले असेल तरीही संविधान पायदळी तुडवून शासन संस्था व कॉर्पोरेट कंपन्या आदिवासींच्या अस्तित्वाला सुरुंग लावणयाचा सपाटा लावत आले आहेत. ह्यावर एकच उपाय म्हणजे देशभरातील आदिवासींची एकजूट व त्यांची राष्ट्रीय चळवळ उभी राहणं आवश्यक आहे.....एकेकट्या विभागाची ही लढाई नाहीये.....!
प्रबळ कॉर्पोरेट नी त्यांच्या पाठीशी उभी असणारी सरकारे याविरुद्ध लढणे हे साधे सोपे आव्हान नाही.
9823529505 sanjayaadim@gmail.com
ओड़िशा पुलिस ने आदिवासी और ग्रामीणों पर बर्बर लाठीचार्ज किया।गाँव वाले JSW के स्टील प्लांट का विरोध कर रहे थे।अभी तक प्लांट को पर्यावरण मंज़ूरी भी नहीं मिली है।लेकिन नवीन पटनायक अपने पूँजीपति दोस्तों को फ़ायदा पहुंचाने के लिए विरोध कर रहे लोगों पर लाठियां बसाई!#JusticeForDhinkia pic.twitter.com/VKLG6E6P57
— Sandeep kishore 🇮🇳 (@sandeepkishore_) January 16, 2022

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार