सोनेखारी आदिवासी मेळावा ; "आदिवासींच्या क्रांती ‌व विररसाने स्वांतंञ्याला कलाटणी मिळाली" इतिहासात पहा:- सुरेशकुमार पंधरे प्रांताध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




 "इमेजबेस लीडरशीप पेक्षा नॉलेज बेस पुढाऱ्यांची समाजाला गरज" सोनेखारी आदिवासी मेळाव्यात सुरेशकुमार पंधरेंचे प्रतिपादन 



"आदिवासींच्या क्रांती ‌व विररसाने स्वांतंञ्याला कलाटणी मिळाली" इतिहासात पहा:- सुरेशकुमार पंधरे प्रांताध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ 



एसके जी.पंधरे विदर्भ ब्युरो चिफ 



तिरोडा/नवेझरी (३जाने):- बालिका दिन तथा आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व संविधान उप समिती सदस्य व हाॅकी टीमचे पहीले कॅप्टन प्रथम आय.ए.एस. महामानव जयपालसिंह मुंडा ११९ व्या जयंतीचे औचित्य साधुन समाज प्रबोधन, व बिरसा झेंडा स्थापणा दिन म्हणुन सोनेखारी येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा समिती शाखा तिरोडाचे वतीने आयोजना प्रसंगी समाजप्रबोधन मेळाव्याचे उद्घाटक सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स, बोलत होते. 


कार्यक्रमाध्यक्ष-शामरावजी उईके जिल्हा सल्लागार गोंदिया, ध्वजा रोहक लिलाधर चांदेवार अध्यक्ष तुमसर, भुमका सुभाष धुर्वेजी, गुड्डुभाऊ बोपचे, राष्ट्रवादी युवा काँग्रेस कार्यकर्ते तिरोडा, महेंद्र भांडारकर, मडावीताई, भुजलाल पटले, सरपंच सोनेखारी, दुर्गेश कळपते, उपाध्यक्ष.जि गोंदिया जंगल, धनराज पुसाम लोणारा, वामनराव बांते पोलीस पाटील आणि संस्कार पीठावर हजर समाज बांधव उपस्थित होते. 


तेव्हा संस्कार पीठावर आरक्षणाचे जनक राजे छञपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतिवीर बिरसा मुंडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव जयपालसिह मुंडा, राणी दुर्गावती मडावी यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. 


याप्रसंगी, उद्घाटकीय भाषणात कायद्याचे राज्य आणा नाहीतर  गुलामीला सामोरे जावे लागेल. असे खणखणीत व झनझनीत अंजन टाकत प्रकाश टाकला. यावेळी सुरेश कुमार पंधरेनी समाज प्रबोधनात आदिवासी समस्या व शैक्षणिक राजकीय,धार्मिक,सांस्कॄतिक चळवळी व उलगुलान, आंदोलण यशस्वी करण्यास व महत्वाचे कार्याला धरून चालण्यासाठी खालील व्यक्ती-विशेष माणसाची निवड करताना देशातील अनिष्ठ सामाजिक व्यवस्था बदलासाठी व्याखा करतांना संभाषण व संगोष्ठी केली.


जल जमीन,जंगल या त्रिसुत्रिचा अभ्यास करून वनसंज्ञेशी एक असणारे कायद्याने समाजमन एक करून संघटना व समाज प्रभुतीने पुढे यावे. स्वतःला झोकून द्यावे तरच न्यायप्रती सरकार कटबध्द असेल.


कुणावरही ईमेज बेस लीडर अन्याय करणार नाही असंघटीतावर अन्याय होणार नाही, असे बेस्ट व नाॅलेजबेस ग्रास लीडर पैदा करा. असे उलगुलान करण्यात  आले.


"पुढे सांगताणा  ईमेजबेस लीडरशिपपेक्षा (नॉलेज बेस अभ्यासू वॄतीचा शिस्तबध्द,निस्वार्थी,पारदर्शक, सत्यवादी नेतॄत्व समाजाला प्राप्त करून देण्यासाठी (लाखात एक सच्चा व कणखर व्यक्ती फक्त समाज संघटणेतील असु शकतो त्यामुळे विखुरलेला समाजघटक एकत्रित आणण्यासाठी, त्याचे विकास व प्रगतीसाठी कायद्याने सक्षम व निर्भीड समाजसेवक न्याय देवू शकतो असे नेते ग्राम पंचायत, पंचायत समिती , जिल्हा परिषदेच्या स्थानिक प्रशासनातून समुदयाने निवडुन पाठवावा... असे आवाहन पंधरे यांच्या तर्फे करण्यात आले. 


आयोजन किशोर धुर्वे, आनंदराव ईळपाते, अनमोल ईळपाते, माधूरी कुंभरे, आशा ईळपाते, माधुरी इळपाते, नगिनाजी धुर्वे, समिता सयाम, नागेश मंडारी, विजयजी वल्के, जितेंद्र कोवाचे, अरविंद इळपाते, सचिन आहाके, यांनी केले. व स्वच्छता, व्यवस्थापण केले. 


प्रसंगी प्रबोधन व गोंडीपुजन कार्यक्रम प्रास्ताविक.राजेंद्रकुमार टेकाम, संचालण मिथून उईके आभार शंकर सयाम यांनी केले.



Post a Comment

0 Comments

झाले