आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
मा. चिंधू आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल
आज दि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बिरसा क्रांती दल दिंडोरी तालुका जिल्हा नाशिक वतीने शासकीय आश्रमशाळा पिंपरखेड येथे इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम ते तृतीय क्रमांक पर्यंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास बिरसा क्रांती दल संघटनेच्या दिंडोरी तालुका महिला अध्यक्षा कु. कविता ताई भोंडवे यांच्या कडून एक सन्मानचिन्ह व ११०० रुपये
द्वितीय क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीस बिरसा क्रांती दल संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष मा. श्री. अशोक जाधव यांच्या कडून एक सन्मानचिन्ह व ७०० रूपये
तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थास तालुका उपाध्यक्ष मा श्री शंकर वासले यांच्या कडून एक सन्मानचिन्ह व ५०० देण्यात आले.
तसेच माध्यमिक विद्यालय पिंपरखेड येथे इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम ते तृतीय क्रमांक पर्यंत सन्मानचिन्ह व शाळेस आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा भेट म्हणून मुख्याध्यापक यांना बिरसा क्रांती दल संघटनेचे तालुकाध्यक्ष मा. अशोक जाधव उपाध्यक्ष मा.शंकर वासले यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे इतर सदस्य पदाधिकारी पिंपरखेड गावातील ग्रामस्थ व मुख्याध्याप, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार