धरतीआबा बिरसा मुंडा वाचनालयाचे भूमिपूजन

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




तळोदा(प्रतिनिधी) 'धरतीआबा बिरसा मुंडा' फाटा लक्कडकोट ( आंबागव्हाण ) येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पवित्र प्रतिमेस पूजन करून बिरसा फायटर्सचा वतीने वाचनालयाचे भूमिपूजन करण्यात आले. 


यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बिरसा फायटर्सचे राज्यमहासचिव राजेंद्र पाडवी बोलतांना ते म्हणाले मानवी मूल्यांनी भरलेली आदिवासी संस्कृती टिकावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाचनालयात आदिवासी साहित्य, क्रांतिकारकांच्या इतिहास, आदिवासी पुस्तके, विद्यार्थ्यांसाठी शालेय, स्पर्धा परीक्षा पुस्तके, दैनिक वृत्तपत्रे हे वाचनालयात उपलब्ध करून दिली जाईल असे मत व्यक्त केले. 


यावेळी बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा, लक्कडकोट शाखा उपाध्यक्ष संजय पाडवी, खर्डीचे पोलीस पाटील गुलाबसिंग पाडवी, जिल्हा सदस्य सुनील पाडवी, लक्कडकोट कार्याध्यक्ष दिनेश वळवी, कुशल पाडवी, मोग्या वळवी, किसन पावरा, दिलीप गावीत, मगन पाडवी, कोथा पाडवी, दिवाण पाडवी, श्रावण वसावे, गणेश पाडवी आदी. कायकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले