पाचोरा तालुक्यातील मांडकी, अंतुर्ली खु, भातखंडे खु, दुसखेडा, परधाडे ह्या गावांमध्ये एकलव्य संघटना नाम फलकाचे अनावरण...

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जलगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )

पाचोरा:-  दिनांक ०७/०१/२०२२ वार शुक्रवार रोजी जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मांडकी, अंतुर्ली खु, भातखंडे खु, दुसखेडा, परधाडे ह्या गावांमध्ये एकलव्य संघटना नाम फलकाचे अनावरण एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष मा.श्री. पवनराजे सोनवणे व एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 




तसेच मोटार सायकल रॅली काडून जनजागृती करण्यात आली व परधाडे येथे संघटनेच्या वतीने आदिवासी समाज प्रबोधन मेळावाचेही आयोजन करण्यात आले होते प्रमुख अतिथी यांची उपस्थित आदिवासी भिल समाजाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, व समाज जनजागृती विषयावर मार्गदर्शन केले. 




ह्या वेळी सोबत एकलव्य संघटना जळगांव लोकसभेचे जिल्हाध्यक्ष तथा भडगांवचे माजी नगरसेवक श्री.संजय सोनवणे युवा जिल्हाध्यक्ष तथा भडगांव तालुका दक्षता समिती सदस्य श्री.रवींद्र सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.पिंटु गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष  सौ.योजना ताई  जिल्हा सल्लागार तथा बांबरुडचे सरपंच श्री.रोहिदास जाधव युवा जिल्हा संघटक श्री.समाधान जाधव पाचोरा तालुकाध्यक्ष तथा भातखंडेचे माजी सरपंच श्री.गणेश वाघ .युवा तालुकाध्यक्ष श्री.गणेश भिल्ल उपाध्यक्ष श्री.प्रताभ सोनवणे विद्यार्थी आघाडी श्री.कैलास सोनवणे टायगर ग्रुप उपाध्यक्ष श्री.राहुल ठाकरे तालुका सल्लाकार श्री.बबन मोरे मार्गदर्शक श्री.रमेश मोरे सर महिला आघाडी तालुकाध्यक्ष लताबाई सोनवणे महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.प्रतिभा ठाकरे चाळीसगाव टायगर ग्रुप तालुकाअध्यक्ष श्री.प्रवीण मालचे भडगाव तालुकाअध्यक्ष श्री.दशरथ मोरे युवा तालुकाध्यक्ष श्री.किरण मोरे शहराध्यक्ष श्री.विनोद मोरे मीडिया प्रमुख श्री.कृष्णा मालचे एरंडोल तालुकाअध्यक्ष श्री.वाल्मीक सोनवणे उपाध्यक्ष श्री.राहुल सोनवणे युवा तालुकाध्यक्ष श्री.जय मोरे मीडिया प्रमुख श्री.गणेश मोरे सल्लाकार श्री.भिवसन बाबा पारोळा तालुकाअध्यक्ष श्री.गणेश गायकवाड तालुका संघटक श्री.समाधान गायकवाड व इतर पदाधिकारी हजर होते.




तसेच आदिवासी भिल समाज बांधव व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते
















Post a Comment

0 Comments

झाले