आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
अमोल पवार मालेगाव उपजिल्हा प्रतिनिधी
मालेगांव:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने नाशिकपूर्व जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या हस्ते जळकू ता. मालेगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी तालुका महासचिव शशिकांत पवार यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
तसेच मालेगांव शहराध्यक्ष कैलास लोहार यांच्या प्रयत्नाने जय मल्हार नगर, मालेगाव येथे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या हस्ते शाखा उदघाटन करण्यात आले.
यावेळी जळकु येथील तालुका सहसचिव प्रविण ऊशीरे यांच्यासह जळकु गावातील प्रतिष्ठित नागरिक दशरथदादा सरपंच शिंदेसाहेब यांच्यासह ज्येष्ठ जिल्हा नेते प्रा.राजेंद्र पवारसर, जिल्हा सदस्य राजू धिवरे तालुकाध्यक्ष सुनील आहिरे कोषाध्यक्ष सिद्धार्थ उशिरे शहर महासचिव ओजेस्विनी पवार शहर उपाध्यक्ष किशोर निकम, अलीम शेख, जवाद अहमद तालुका प्र.प्रमुख सतीश मगरे कार्यालयीन प्रमुख संतोष बोराळे यांच्यासह जळकु व जयमल्हार नगर शाखा कार्यकारणी पदाधिकारी, ग्रामस्थ व परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार