ग्रीनफ्रेंड्स तर्फे अभिनव पर्यावरणस्नेही पतंग स्पर्धेचे आयोजन

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




पर्यावरणस्नेही मकरसंक्रांत निमित्ताने वृक्षवाणाचे  व तसेच फुलरोपांचे वाटप

विद्यार्थ्यांनी स्पर्धाद्वारे दिला 'नायलान मांज्याचा वापर टाळा -पक्ष्यांना वाचवा' चा संदेश


एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ

लाखनी:- ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब द्वारे दरवर्षी पर्यावरणस्नेही मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पक्ष्यांना नायलॉन व चायनिज मांज्यापासून वाचवा असे संदेश देणारी स्पर्धा त्याचप्रमाणे महिलांना 'वाण' म्हणून 'वृक्षरोपे' तसेच 'फुलरोपे' यांचे वाटप या निमित्ताने केले जाते. यावर्षी सुद्धा मकरसंक्रातीच्या पर्वावर 15 जानेवारीला पर्यावरण संदेश जागृती पतंग स्पर्धा व 'वृक्षवाणा'चे वाटप कार्यक्रम ग्रीनफ्रेंड्सच्या कार्यालयात तसेच लाखनी बसस्थानकावर घेण्यात आला. 


यावेळी नेफडो जिल्हा शाखा भंडारा व अभा अंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा शाखा भंडारा यांचे तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखनी व अशोका बिल्डकॉन चे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला ग्रीनफ्रेंड्स चे अध्यक्ष अशोक वैद्य, ग्रीनफ्रेंड्स चे कार्यवाह प्रा.अशोक गायधने, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर, पदाधिकारी निसर्गमित्र पंकज भिवगडे, योगेश वंजारी व हरितसेना शिक्षक दिलीप भैसारे, सर्पमित्र सलाम बेग मिर्झा उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांनी स्वहस्ते पक्ष्यांच्या आकारात पतंग तयार करून आकर्षक रित्या पक्षी- प्राणी यांची सजावट केली, त्यामध्ये त्यांनी नायलॉन व 'चायनिज मांज्याचा वापर टाळा व मला वाचवा' असे पक्षी चित्र माध्यमातून लिहिले. 


यावेळी  ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी स्पर्धकांना मकरसंक्रातीच्या काळात नायलॉन व चायनिज मांज्याद्वारा किती मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची, प्राण्यांची हानी तसेच जखमी होतात त्याचप्रमाणे अनेक व्यक्ती कसे गंभीर जखमी होतात तर काही जण आपले जीव सुद्धा गमावतात याबद्दल विस्तृतपणे आकडेवारी सादर केली व सर्व पतंग विक्रेत्यांनी नायलॉन तसेच चायनिज मांज्या न वापरता त्याचप्रमाणे प्लास्टिक पासून तयार झालेली पतंग न वापरता कागदी पतंग तसेच साध्या धाग्याचा वापर टाळावा असे आवाहन केले.


स्पर्धकांनी स्वहस्ते  तयार केलेल्या  पतंगावर विविध प्रकारचे घोषवाक्य इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत लिहिले. यामध्ये 'सेव्ह काईट फ्रॉम काईट' 'अव्हाइड नायलॉन स्ट्रिंग अँड सेव्ह द बर्डस' 'सेव्ह टायगर अँड अनिमल्स' 'मला वाचवा-मला आनंदाने विहार करू द्या' अश्या सारखे अनेक घोषवाक्य लिहिले. स्पर्धकांनी तयार केलेले आकर्षक पतंग बसस्थानकावर सर्व प्रवाशी तसेच आजुबाजूच्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मकरसंक्रातीच्या निमित्ताने अनेक महिलांना वृक्षवाण  ग्रीनफ्रेंड्स तर्फे प्रा अर्चना गायधने यांनी दिले.

   

पर्यावरण जागृती पतंग बनवा स्पर्धेत सिद्धार्थ विद्यालय सावरी मधून ओंकार चाचेरे याचा प्रथम क्रमांक, श्रीनय चाचेरे याचा व्दितीय क्रमांक तर रोहित कुंभरे याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. जि. प.गांधी विद्यालय लाखनी येथून मंथन चाचेरे याला प्रथम क्रमांक  तर नयन बांगळकर याला द्वितीय तर रेहान चाचेरे याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. एम डी एन फ्युचर स्कुलचा अर्णव गायधने याला प्रथम क्रमांक तर संताजी प्राथमिक शाळेचे ओंकार आगलावे व आराध्या आगलावे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 


स्पर्धेचे परीक्षण प्रा.अर्चना गायधने, अशोक वैद्य,ज्येष्ठ नागरिक मंगल खांडेकर इत्यादींनी केले. 


यानंतर सर्व स्पर्धकांनी पर्यावरणस्नेही पतंग बसस्थानकावर काही काळ उडवून सर्वांना या अभिनव व अनोख्या अशा 'पर्यावरणस्नेही मकरसंक्राती'चा संदेश दिला.




Post a Comment

0 Comments

झाले