आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
वडेगांव ( तिरोडा) येथे स्मारक समिती बिरसा फायटर्सच्या वतीने बिरसा अनावरण सोहळा संपन्न.
एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ
तिरोडा-(१६ जाने) वडेगांव येथे शहीद धरतीआबा बिरसा मुंडा स्मारक समिती व कार्यक्रमाध्यक्ष- सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ, निता रंहांगडाले माजी सभापती तिरोडा, तुमेश्वरी बघेले सरपंच / समन्वयक सरपंच परिषद, यांचे प्रमुख उपस्थीतीत बिरसा मुंडाचे पूतळा अनावरण सोहळा पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एस जी उईके कॄषी अधिकारी/महासचिव बिरसा फायटर्स विदर्भ, मिनाक्षी जगने उपसरपंच, राकेश कुभरे, ता. अध्यक्ष तिरोडा भोजराज उईके जिल्हाध्यक्ष, मुन्ना जी सलामे जि.सल्लागार, गोंदिया झामसिंगजी भोयर, वसंत मडावी, भाग्यश्री केळवतकर, निकिता धुर्वे, विनायक थडगे तं.मु.स अध्यक्ष वडेगांव सुनिता मडावी मा.जि सदस्या मुर्तीकार घनशाम लिल्हारे संस्कार पीठावर हजर होते.
त्यापुर्वी गावातून वाजत गाजत बिरसा मुंडाची रॅली कोरोनाचे सर्व नियम पाळून रॅली काढण्यात आली. व धर्मपुजा आदिवासी परंपरेनुसार भुमक दिनेश मडावी यांनी विधीवत पार पाडली.
संस्कार पीठावरून कार्यक्रमाध्यक्ष सुरेशकुमार पंधरेंनी आदिवासी आरक्षण व संस्कृती टिकवण्यासाठी क्रांतीसुर्य माता व आदि नारीशक्ती साविञी फुले, व डाॅ. बाबासाहेब यांनी दिलेला "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र समाजातील प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे तो प्राशन करणारा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. व गुलामीतून मुक्त करेल असे सांगितले.
आपली अनुसूचित जमात वाघाच्या शक्ती, तपोबल, तेज चपळ असून निसर्गात राहणारी असल्याने त्यांचे तपोबल भारतीय कोरोनाला हरवू शकतो.
मजबुत व निर्भय समाज निर्माण करा व संघर्षाचा सामना करा असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरवात गोंडी नृत्य गीतांनी केले याप्रसंगी संस्कारपीठावर इतर मान्यवरांचे समाज प्रबोधन भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झामसिंग भोयर तर संचालन व समारोप सांगता संजयजी मडावी गुरुजी यांनी केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार