मालेगांव कॅम्प येथील सम्राट चौक पंचशील नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखा फलकाचे अनावरण

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




वंचित बहुजन आघाडी, मालेगांव शहर 

शशिकांत पवार सर 

मालेगांव:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने नाशिकपूर्व जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या हस्ते व प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगांव कॅम्प  येथील सम्राट चौक पंचशील नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.




मालेगांव शहराध्यक्ष कैलास लोहार यांच्या नेतृत्वाखाली व शहर उपाध्यक्ष दिलीप सोनवणे तालुका उपाध्यक्ष संदीप पवार यांच्या प्रयत्नाने पंचशील नगर, सम्राट चौक, कॅम्प मालेगाव येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापुरुषांना अभिवादन केल्या नंतर जिल्हाध्यक्षांच्या हस्ते शाखा फलकाचे उदघाटन करण्यात आले.




मा.जितरत्न पटाईत व मा. कपिलभाऊ आहिरें यांनी शाखा फलक अनावरणाचे महत्व विशद करत वंचित बहुजन आघाडीची भूमिका उपस्थितांना सांगितली.




यावेळी जिल्हा नेते प्रा.राजेंद्र पवार सर, जिल्हा सदस्य राजू धिवरे तालुका कोषाध्यक्ष सिद्धार्थ उशीरे, शहर उपाध्यक्ष किशोर निकम, शहर प्रसिद्धी प्रमुख अमोल पगारे आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले