अनुसुचिय क्षेत्रातील नगरपंचायतींच्या आणि अध्यक्ष पदांच्या निवडणूका अवैद्य

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




राज्य पञकार संघ प्रतिनिधी - एसके जी. पंधरे

श्री .महेश पाठक, सचिव नगरविकास विभाग ,मंत्रालय ,मुंबई  (E mail : sec.ud2@maharashtra.gov.in) यांस अनुसुचित क्षेत्रातील  नगर पंचायतीच्या  निवडणुका  अवैद्द  असल्याचे 11.11.2020 च्या ईमेल  ने कळविले  होते कारण संसदेने राज्य घटनेच्या भाग नऊ क मधील अनुच्छेद 243 यग नुसार अनुसूचीत क्षेत्रातील नगर पंचायती संबधी कायदा केलेला नाही. दिनांक 11.11.2020 चे ई-मेल द्वारे  पाठविलेले पत्र त्यांना मिळाले होते, ज्याचे उत्तर  त्यांनी अद्यापही दिलेले नाही तसेच निवडनुका रद्द करण्यासबंधि कार्यवाही केली नाही.

    

संविधानात नगर पंचायती सबंधि स्पस्ट तरतूद असतांना राजकिय  नेतेआणि शासनातील नोकरशहाकार्यवाही करत नसतील तर संविधानाप्रती  ते जागरूक नाहीत किंवाअज्ञानी आहेत असेच  म्हणावे लागेल 


प्रसिद्द वृत्तानुसार  शासनाचे म्हणणे की सन २०२० च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. १२ नुसार ममध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार नगरपंचायतींचे नगराध्यक्ष हे प्रचलित पद्धतीने नगरसेवकांमधूनच निवडले जात असून त्यांचा पदावधी अडीच वर्षे इतका करण्यात आला आहे. 


राज्य निवडणूक आयुक्त यू पी एस मदान यांनी 6 फेब्रुवारी 2020 आणि अवर सचिव, निवडणूक आयोग यांनी 12.10.2020 रोजी नगर पंचायतीच्या  निवडणुका  घेन्याचे आदेश जाहिर केले होते.

  

सरकारच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम, 1965 चे कलम 341क चे पोटकलम (1) (1) आणि (2) नुसार महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेप्रमाणे  अनुसूचित क्षेत्रातनगर पंचायतीची स्थापना केली आहे

संबंधित अधिनियमाच्या कलम 341 अ (1) प्रमाणे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 243 च्याखंड (2) मध्ये उल्लेखिलेले घटक विचारात घेऊन राज्य शासनाला राज पत्रातील अधिसूचनेद्वारे ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात संक्रमित होत असलेले क्षेत्र है संक्रमनात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करता येईल

  

कलम 341अ (1अ) च्या पोटकलम (1) च्या परन्तुकामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, राज्य शासनाला राज्य पत्रातील अधिसूचनेद्वारे जिल्हा मुख्यालय किंवा तालुका मुख्यालय असलेले क्षेत्र संक्रमणात्मक क्षेत्र म्हनुन घोषित करण्यात येईल. 

कलम 341अ (1अ) (2) च्या पोट कलम (1) अन्वये अशा प्रकारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक संक्रमणात्मक क्षेत्राकरिता 341 ब मध्ये तरतुद केल्याप्रमाने एका नगर पंचायतीची रचना करण्यात येईल.

राज्य घटनेतील "भाग नउ- क" च्या अनुच्छेद24३थ (1) आणि ( 2 ) प्रमाणे प्रत्येक राज्यातसंक्रमनशील क्षेत्रासाठीगठित करण्यात येईल.एक नगर पंचायत गठितकरण्यात येईल

मात्र घटनेतील भाग नऊ-क च्या भागातील कोणतीही बाब घटनेतील अनुच्छेद २४३यग नुसार अनुच्छेद 244 च्या खंड (1) मध्ये निर्देशलेल्या लागू होनार नाही


वरील  तरतूदी नुसारअनुसूचित क्षेत्रतिल  संपूर्ण तालुके, तालुका ठिकानासह अनुसूचित क्षेत्रात येत असल्याने तेथे  अनुच्छेद ४३यग नुसर नगर पंचायती गठित करता  येत नाहीत  तर तेथे पेसा कायद्यानुसार शासन  झाले पाहिजे

  

राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी जाहीर केले असून .त्यात अनुसूचित जमातीसाठी १३ पदे राखीव केली आहेत  आरक्षण  सोडतप्रसंगी उपसचिव श्रीमती प्रियांका कुलकर्णी-छापवाले, अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे हे प्रत्यक्ष तर  अमरावती, नागपूर, कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक या विभागीय आयुक्त कार्यालयांमधून जिल्हा प्रशासन अधिकारी आणि संबंधित नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


अनुसूचित जमाती प्रवर्गात अध्यक्षपदासाठी एकूण १३ जागा राखीव असून त्यातील ७ अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी तर ६ जागा अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. 

अनुसूचित क्षेत्रातील खालील नगरपंचायती ज्या पूर्णता:अनुसूचित क्षेत्रात येतात त्यांचे अध्यक्ष  पद जे खुला प्रवर्ग (महिला व सर्वसाधारण)साठी राखीव- ठेवले  आहे चुकीचे आहे

1)एटापल्ली,   

2)सिरोंचा, 

3)कोरची, 

4)कुरखेडा

5)भामरागड--- गडचिरोली जिल्हा

6)धारणी-, अमरावती जिल्हा

7) ,पेठ, , 

8)सुरगाणा,--नाशिक जिल्हा

9)धडगाव (अक्रानी)- नंदुरबार जिल्हा

10)तलासरी, 

11)मोखाडा, 

12)विक्रमगड, 

13)वाडा, - पालघर जिल्हा 

 

राज्याचे विद्वान राज्यपाल, संबधित नगर विभागाचे मंत्री, सचिव, निवडणूक आयुक्त, विधान मंडळाचे आमदार, नगरसेवक आणि अदिवासी जनतेला विनंती आहे  की  त्यांनी यात  लक्ष घालून  योग्य कार्य वाही  करावी.



एकनाथ भोये  स्थळ : नाशिक

दिनांक  28.1.2022 (Mob 8975439134                          

ईमेल ekbhoye@gmail. com

Post a Comment

0 Comments

झाले