"एस्. टी. कर्मचाऱ्यांनी संपाविषयी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे."

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




             

: ✒ अमोल बाळासाहेब बच्छाव सर 

                

शासन एस. टी. कर्मचारी संपाला नकारात्मक्तेकडे घेऊन जाऊ पाहत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमिवर लागू होणारे निर्बंध परिवहन क्षेत्रातही आणले गेले तर बस कर्मचाऱ्यांचा सध्या सुरु असणाऱ्या संपाचे दबावतंत्र-उपद्रवमुल्य, प्रभावक्षमता आणि परिणामकारता क्षीण केली जाईल. असे झाले तर आतापर्यंतच्या संपाची तीव्रता कमकुवत होईल. पुढे निर्बंध काहीकाळ कायम राहिले तर शासनाचे कर्मचाऱ्यांप्रतिचे उत्तरदायीत्व झटकून टाकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

          

असे झाले तर कर्मचाऱ्यांचे वेतन, अन्य आर्थिक देय यांविषयीचे प्रश्न निर्माण होतील आणि ते कर्मचाऱ्यांना परवडणारे असणार नाहीत. म्हणून कर्मचाऱ्यांनी ओमायक्रॉनचे निर्बंध बस-परिवहनाला लागू होण्याआधीच संपाबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा ही प्रामाणिक अपेक्षा, 


संपाला पाठींबा होता आणि पुढेही राहणारच आहेत पण, ज्यांचे कुटूंब एस्.टी च्या वेतनावर अबलंबून आहे त्यांचे जर वेतन दीर्घकाळ टांगणीवर पडले तर अशा आपत्तीजन्य परिस्थितीत त्या कुटूंबाचे व्हायचे काय ? या काळजीपोटी शासनाच्या कूटनीतीचे आपण बळी ठरु नयेत यासाठी हे मत व्यक्त करावेसे वाटते. आपत्तीजन्य परिस्थितीत अन्य कामही भेटणे जिकिरिचे होईल अशा वेळी, कुटूंब उदरनिर्वाह, आरोग्य यांसारख्या मुलभूत बाबी सांभाळायच्या कशा असा प्रश्न उपस्थित होईल. 


त्यासाठी शासनाने संपामध्येच कोरोना निर्बंध नियमित करण्याआधी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा आणि परिवहनाला निर्बंध लागू होण्याआधी दोन दिवस का होईना कामावर रुजू झाले तर किमान निर्बंध काळातील सेवा नियमित समजली जाईल व शासन आपल्याप्रति उत्तदायी ठरेल. 

                

यासाठी एस. टी कर्मचाऱ्यांनी वेळीच योग्य निर्णय घ्यायला हवा.






Post a Comment

0 Comments

झाले