नेताजी सुभाषचंद्र बोस व रामगड संमेलनात ( १९४० ) त्यांना मोलाची साथ देणारे आदिवासी नेते जयपाल सिंग मुंडा

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




✒️डॉ.संजय दाभाडे सर  , पुणे 9823529505  Dr. Sanjay Dabhade Sir 


▪️ २३ जानेवारी २०२२ , नेताजींची जयंती .



आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यानिमित्त देश त्यांना अभिवादन करत आहे. ह्यानिमित्ता ने नेताजी व झारखंड आंदोलनाचे नेते व आदिवासींचे संविधान सभेतील प्रतिनिधी जयपाल सिंग मुंडा ह्यांच्या बद्दल काही तथ्य समोर ठेवणें उचित होईल.


१९४० च्या सुमारास नेताजी नी झारखंड ( तेंव्हा बिहार )  मधील रामगड इथे महासंमेलन ( समझोता विरोधी संमेलन ) आयोजित केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांना साथ द्यावी की नाही हा वाद काँग्रेस मध्ये सुरू होता व नेताजींचे म्हणणे होते की कोणत्याही परिस्थितीत ब्रिटिशांशी सहकार्य न करता भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी हीच वेळ साधली पाहिजे. नेहरू ना मात्र हिटलर - मुसोलिनीच्या  फॅसिझम चा धोका वाटत होता व साहजिकच काँग्रेस ब्रिटिशांना सध्या तरी सहकार्य करण्याच्या भूमिकेत होती.


तर दुसरीकडे  ब्रिटिशांशी समझोता करण्यास नेताजींचा विरोध होता म्हणून नेताजींनी समझोता विरुद्ध संमेलन रामगड इथेच आयोजित करायचे ठरवले. 


काँग्रेसचे अधिवेशन देखील रामगड इथच ठरले होते व काँग्रेसच्या त्या अधिवेशनाच्या बरोबर काहीच दिवस आधी नेताजींनी रामगड इथेच स्वतंत्र संमेलनाची तयारी सुरू केली होती. 


त्यावेळी राजेंद्र प्रसाद ह्यांचा वरचष्मा होता कारण काँग्रेसचे ५३ वे अधिवेशन रामगड इथ म्हणजेच प्रसादाच्या कार्यक्षेत्र असलेल्या बिहार इथ होऊ घातले होते. 


ह्या पार्शवभूमीवर नेताजींनी त्यांचे संमेलन आयोजित करण्यात जयपाल सिंग मुंडा ह्यांचे सहकार्य मागितले कारण दक्षिण बिहार मध्ये म्हणजेच आताच्या झारखंड मध्ये जयपाल सिंग ह्यांचे मोठे नाव व काँग्रेसच्या पलीकडे स्वतःचे आदिवासी चळवळीच्या माध्यमातून मोठे अस्तित्व होते.

जयपाल सिंग ह्यांनी नेताजींच्या ह्या रामगड संमेलनासाठी आदिवासींची मोठी ताकद दिली. 


राजेंद्र प्रसाद ह्यांच्याकडून रामगड क्षेत्रात फार विरोध होणे शक्य नव्हत कारण जयपाल सिंग हे स्वतंत्र ओळख असणारे व कुणाची पर्वा न करणारे नेते होते. रांची - रामगड रस्त्यावर कलम १४४ लागू करण्यात आले, परंतु जयपाल सिंग ह्यांनी जंगलाच्यांतून रस्ता काढत ५००० हुंन अधिक आदिवासींच्या सह नेताजीच्या संमेलनात सहभाग घेतला व नेताजींचे रामगड संमेलन यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. 


जयपाल सिंग नेताजी यांचेकडे तक्रार करत होते की राजेंद्र प्रसाद वगैरे मंडळी छोटा नागपूर नी संथाल  परगणाच्या आदिवासी इलाख्याला दुजाभाववाची वागणूक देतात. 


नेताजींनी आदिवासी नेते जयपाल सिंग मुंडा ह्यांची साथ घेतली,  ब्रिटिशांच्या विरोधात रणशिंग फुंकले व समझोता विरोधी संमेलन यशस्वी केले. 

नंतर लगेचच काही दिवसांत रामगड इथेच काँग्रेस चे अधिवेशन अबुल कलाम आझाद ह्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

   

नेताजी सुभाषचंद्र बोस नी आदिवासींचे थोर नेते जयपाल सिंग मुंडा ह्यांचं हे एकत्रित येणं ही ऐतिहसिकदृष्ट्या मोठी घटना असताना इतिहासात त्यांची योग्य दखल घेतली गेली नाही हे दुर्दैव.


समाजातील शोषित - वंचित समूहातील थोर व्यक्तींचे योगदान असे अड्गळीत टाकले गेले आहे, आता त्या समहुहांतील नव्या पिढीने त्या इतिहासाला उजागर करत राहिले पाहिजे.



Post a Comment

0 Comments

झाले