आदिवासी समाजातील, बागलाण विधानसभेचे माजी आमदार कै. शंकर अहिरे यांच्या पत्नी सरस्वती अहिरेंच्या समस्यानिवारण्यासाठी आदिवासी मित्र प्रा. अमोल बच्छाव सर यांनी घेतली धाव.

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


सरस्वती अहिरेंच्या समस्यानिवारण्यासाठी आदिवासी मित्र प्रा. अमोल बच्छाव यांनी घेतली धाव.

 

सटाणा : देवळा तालुक्यातील माजी आमदार कै. शंकर दौलत अहिरे यांच्या पत्नी सरस्वती अहिरे काहीतरी अडचणीत आहेत हे कळताच आदिवासी मित्र, जनसेवक प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी त्यांच्या  महालपाटले ता. बागलाण (नाशिक) येथिल निवास्थानी जाऊन भेट घेतली.




शंकर दौलत अहिरे सन १९९९ ते २००४ या कालावधीत तत्कालिन बागलाण (७९) विधानसभेचे अनु. जमाती प्रवर्गामधून भारतीय जनता पार्टीचे आमदार होते. त्यांचे निधन दि. ०८ सप्टेंबर २०२१ रोजी झाले.

         


त्यांना मुलगा नाही, नातजावई त्यांचा सांभाळ करतात ते ही अतिशय मृदू स्वभाव आणि अल्पशिक्षित असल्याने श्रीमती सरस्वतीबाई अधिकच हतबल झालेल्या जाणवले. प्रा. बच्छाव यांनी त्यांची भेट देऊन चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तेव्हा कळाले की आमदारांचे (शंकर आप्पा) निधन होऊन पाच महिने होत आले, पण अद्याप त्यांना माजी आमदाराची पत्नी म्हणून मिळणाऱ्या शासकीय पेन्शन संदर्भात प्रश्न मार्गी लागलेला नाही. विधानसभेचे पत्र आले आहे पण त्याविषयीही कोणी अद्याप पाठपुरावा केलेला नाही असे दिसून आले असता त्यांच्या पेन्शनच्या अर्जाची पुर्तता तात्काळ करुन पुढील पाठपुरावा करुन देत त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रा. अमोल बच्छाव यांनी तात्काळ पाठपुराव्यासाठी पावले उचलली.

                


भेटायला गेल्यामुळे व त्यांचे प्रश्न सोडवून देत असल्याचे समजल्यावर सरस्वती आजींनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या ; "आमदार होते तेव्हा बसायला खुर्च्या पुरत नव्हत्या आता मात्र कोणी येत नाही, विचारतही नाही. तुम्ही आलात बरे वाटले, येत रहा..!" अशी हवालदिल होत त्यांनी खंत व्यक्त केली.



यावेळी वंचित बहुजन आघाडी बागलाण तालुका महासचिव दादा खरे, दिपक बच्छाव, पंकज खरे यांनीही सरस्वती आजींसोबत संवाद साधून धीर देण्याचा प्रयत्न केला.

            

परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष पुरवून संबंधित कुटूंबाला योग्य त्या सर्व सुविधा मिळवून द्याव्यात अशी भावना यावेळी आदिवासी मित्र, जनसेवक, वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा प्रवक्ता प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी व्यक्त केली.










Post a Comment

0 Comments

झाले