आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
महाआवास योजना अभियान सन २०२१-२२ मध्ये पुरस्कारासाठी वडेगांवला सज्ज करूया.
एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो च़िफ
साकोली (६जाने) रोहयो कामात व महाआवास अभियान योजना सन २०२१.२०२२ मध्ये वडेगांव ( निर्मलग्राम) गावाला अग्रेसर यादीत आनू असे प्रतिपादन सुरू असलेल्या कामावर आयोजित सभेत मजूरांना कोरोणा नियम व डिजिटल व मोबाईल चे फायदे व तोटे सांगतांनी आपले मोबाईल नंबर आधारशी जोडावी तरच योजनांचा सरळ सरळ फायदा लाभार्थ्यांणा होईल असे प्रति- पादन सुरेशकुमार जी.पंधरे समन्वयक,सरपंच परिषद मुंबई जिल्हा शाखा भंडारा यांनी केले.
महा आवास अभियान अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांनी केवायसी लिंक,जेणेकरून आँन लाईन पेमेंटला अडचन जाणार नाही असेही प्रास्ताविकेतून एस एस हातझाडे ग्रामसचिव यांनी मजुरांना सांगितले
आजचे कामा वरिल मजूर संख्या २७४ इतकी होती.यावेळी रोहयो इंजिनियर पंकज टेंभुर्णे,घरकुल इंजिनियर मधुर अरूण टिचकुले सर यांनी मजूरांना महाआवास योजना राज्य पुरस्कार व कामाविषयी सविस्तर माहिती दिली.
अनूदान मिळविण्यासाठी घरटँक्स भरावे व वेळोवेळी शासनाचे नियम,अटी निर्बंध पाळावे असे आवाहन केले यावेळी आँपरेटर हरिश्चंद्र एच. कापगते,सुखराम मेश्राम पाणी पुरवठा,चंद्रशेखर भानारकर व मा ग्राम पंचायत सदस्य हजर होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार