आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जलगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )
जळगांव ( प्रतिनिधी ):- दिनांक : ०८/०१/२०२२ वार शनिवार रोजी जामनेर शहरातील बोदवड पाचोरा नाका येथुन एकलव्य संघटनेच्या माध्यमातून सामाजिक मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती. या मोटार सायकल रॅली ने जामनेर शहराचे लक्ष वेधले होते.
| भगवान वीर एकलव्य |
जामनेर तालुक्यातील वाकी, जामनेर पुरा, खडकी, गारखेडा, गावांमध्ये एकलव्य संघटनेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती व एकलव्य संघटनेच्या शाखा उदघाटन देखील करण्यात आले. एकलव्य संघटनेच्या माध्यमातून गारखेडा येथे आदिवासी भिल समाजाचा प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.पवनराजे सोनवणे साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष मा.सुधाकरराव वाघ साहेब, रावेर लोकसभा जळगांव जिल्हाध्यक्ष मा.निवृत्ती भाऊ पवार, जामनेर तालुका अध्यक्ष मा.विलास मोरे, जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष मा.संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष मा.रवींद्र सोनवणे, जळगांव लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष मा.पिंटू गायकवाड, रावेर लोकसभा युवा जिल्हा कार्याध्यक्ष मा.समाधान सोनवणे, धुळे विध्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष मा.दादू माळचे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मा.सुरेश मोरे सर, जळगांव तालुकाध्यक्ष मा.मंगल सोनवणे, मुक्ताईनगर तालुका सचिव मा.भगवान गायकवाड सर, जामनेर तालुका उपाध्यक्ष मा.दिपक सोनवणे, युवा तालुकाध्यक्ष जामनेर मा.समाधान सोनवणे, तालुका सचिव मा. कृष्णा जाधव, तालुका कार्याध्यक्ष मा. सुक्राम मोरे, एकलव्य टायगर गृप तालुकाध्यक्ष मा.अशोक मोरे, तालुका संघटक मा.गोविंदा माळी, तालुका सल्लागार मा.मनसाराम सोनवणे, एकलव्य टायगर गृप मा.सोपान मोरे, जळगांव शहराध्यक्ष मा.राहून ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आदिवासी भिल समाज बांधव व एकलव्य संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार