आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल
चंद्रपूर ( जिल्हा प्रतिनिधी ):- आज दिनांक.२४/०२/२०२२ रोजी बिरसा क्रांती दल ची आढावा बैठक चंद्रपूर विश्राम गृह येथे संपन्न झाली. बैठकीत जिल्हा तथा तालुका चे क्रायकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अधयक्षस्थानी मा. विष्णू जी कोवे (राज्य संघटक, बिरसा क्रांती दल) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री प्रभाकर गेडाम उपस्थित होते.
बिरसा क्रांती दल ची समोरची वाटचाल काय असणार या बद्दल माहिती दिली. उपस्थित मा.प्रभाकर गेडाम, समाजपरिवर्तन कसे होणार, बिरसा क्रांती दल ची समोरची वाटचाल काय राहायला हवी याबद्दल माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या रंजना कींनके, मधुकरजी कोडापे, धनराजजी ताडाम, प्रलाद जी गेडाम, प्रकाश जी मेश्राम, मनोहरजी मेश्राम, दशरथ जी गेडाम, चारुदत्त तोडकर प्रामुख्याने उपस्थित होते.
- 1)संघटना प्रसार व प्रचार कसा करावा ह्या बद्दल चर्चा करण्यात आली.
- २)बिरसा मुंडा आदिवासी सहकारी पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- 3)तालुका तिथे बिरसा क्रांती दल शाखा सुरु करुन कार्यकारिणी गठित करणे.
- ४)गाव, पाडा, गुडा तिथे शासकीय योजनां पोहचवून शिक्षण, आरोग्य विषयक कामे करून समाजाचा विकास करणे.
अश्या बऱ्याच विषयावर चर्चा करून बिरसा, शाहू, फुले, आंबेडकर ह्यांचे विचार घरा घरात पोहविण्यासाठी प्रयत्न करण्याची ध्येय येणार काळात करू अशी एकमताने निर्णय घेतला गेला.
बैठकीला रमेश आडे जिल्हाध्यक्ष बिरसा एम्प्लॉइज फोरम, संतोष कुळमेथे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, अभिलाष परचाके यूवा जिल्हाध्यक्ष, जितेश कुळमेथे जिल्हा महासचिव, शुभाष शेडमाके जिल्हा उपाध्यक्ष, सुशील मडावी जिल्हा उपाध्यक्ष, सूप्रशिल गेडाम जिल्हा युवा उपाधक्ष्य, प्रीति मडावी जिल्हा उपाध्यक्ष महिला, किरणताई गेडाम जिल्हा उपाध्क्षक्षा, रेखा कुमरे तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर, पूर्णिमा तोडकर तालुका सचिव चंद्रपूर, निर्मला मेश्राम तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर, नरेंद्र कुलमेथे तालुका महासचिव राजुरा, दिवाकर मेश्राम तालुका उपाध्यक्ष चंद्रपूर, सुनील मेश्राम शहर उपाध्यक्ष चंद्रपूर, सोबत इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश कुलमेथे, प्रास्तविक भाषण किरण ताई गेडाम, आभार अभिलाष परचाके, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभाष शेडमाके, सुनील मेश्राम, दिवाकर मेश्राम, सुप्रशिल गेडाम ह्यांनी सहभाग घेतला.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार