एकलव्य संघटनेचे ( Eklavya Sanghatana ) "विदर्भ संपर्क अभियान" दौऱ्याला बुलढाणा जिल्ह्यातून सुरुवात...

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Eklavya-Sanghatana-Vidarbha-Sampark-Abhiyan


Eklavya-Sanghatana-"Vidarbha-Sampark-Abhiyan"

निवृत्ती भाऊ पवार ( एकलव्य संघटना जळगांव जिल्हा अध्यक्ष रावेर लोकसभा )

बुलढाणा ( जिल्हा प्रतिनिधी ):- आज दिनांक : १७/०२/२०२२ वार गुरुवार रोजी एकलव्य संघटनेचे विदर्भ संपर्क अभियान दौऱ्याला बुलढाणा जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली. एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व एकलव्य संघटना ( Eklavya Sanghatana )  प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब हे बुलढाणा जिल्हा दौरा वर आले असता बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांचे बुलढाणा शासकीय विश्रामगृह येथे जंगी स्वागत करण्यात आले.  


Eklavya-Sanghatana-Vidarbha-Sampark-Abhiyan




यानंतर श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय येथे एकलव्य संघटनेची बुलढाणा जिल्हा बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्षस्थानी मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब प्रदेशाध्यक्ष व मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब प्रदेश कार्याध्यक्ष तसेच श्री. मधुकरराव पवार सर प्रदेश सचिव उपस्थित होते.  


Eklavya-Sanghatana-Vidarbha-Sampark-Abhiyan

Eklavya-Sanghatana-Vidarbha-Sampark-Abhiyan


बुलढाणा जिल्ह्यातील एकलव्य संघटनेची ( Eklavya Sanghatana )  प्रथम जिल्हा बैठक मोठ्या उत्साहात व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाली उपस्थित पदाधिकारी व समाज बांधवांना प्रदेश अध्यक्ष व प्रदेश कार्याध्यक्ष त्यासोबतच प्रदेश सचिव यांनी मार्गदर्शन केले. तसेच अकोला जिल्हा परिषद सदस्य श्री. पंजाबराव पवार यांनी प्रदेश अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य संघटना मध्ये प्रवेश केले. श्री. पंजाबराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच अकोला जिल्हा एकलव्य संघटनेचे पद नियुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 


तसेच ह्या वेळी जिल्हा बैठकीला बुलढाणा जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प समिती अध्यक्ष सौ. नंदिनीताई टारपे एकलव्य संघटना ( Eklavya Sanghatana ) जालना जिल्हाध्यक्ष तसेच बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख श्री.आत्मराम गायकवाड जळगांव जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा श्री.निवृत्ती पवार औरंगाबाद जिल्हा सचिव श्री.परशुराम सोनवणे जळगांव लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष श्री.पिंटूभाऊ गायकवाड जळगांव रावेर लोकसभा जिल्हा युवा संघटक श्री. समाधान जाधव जामनेर तालुकाध्यक्ष श्री.विलासराव मोरे जळगांव शहराध्यक्ष श्री.राहूल ठाकरे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री.विक्की गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष श्री.अंकुश गायकवाड मोताळा तालुकाध्यक्ष श्री.शिवाजी मोरे श्री. विष्णू बर्डे श्री.समाधान सोनवणे श्री.कृष्णा जाधव श्री.सुक्राम मोरे श्री.सोपान मोरे श्री. अशोक मोरे श्री.मनसाराम मोरे तसेच बुलढाणा जिल्ह्यातून आदिवासी भिल समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments

झाले