आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
✍️गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना
नंदुरबार दि.२२ ( प्रतिनिधी ) शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा, प्रकाशा येथे वर्षभरात विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त व संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त "स्वच्छतेचे महत्त्व, माझी वसुंधरा, माझी जबाबदारी वर चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, शालेय क्रिडा स्पर्धा" आयोजित करण्यात आल्या होत्या.
सदरील नाविन्यपूर्ण स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व सहभागी स्पर्धकांना बक्षीस वितरण सानेगुरुजी मित्र मंडळ शहादाचे अध्यक्ष माणक चौधरी, प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर, अवंतिका फौंडेशनच्या अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर, तलाठी धर्मराज चौधरी, जेष्ठ नागरिक प्रताप चव्हाण, जायन्ट्सच्या सचिव आशा चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी संत गाडगेबाबा बाबा व परमपूज्य सानेगुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदरील पारितोषिक वितरणात प्रशस्तीपत्र, लेखनपॅड, पेन, लेखन साहित्य भेट देण्यात आले. सानेगुरूजी मित्रमंडळाचे माणकभाईंनी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणार्या गुरुजनांचे आभार मानले.
तसेच अवंतिका फौंडेशनच्या अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले बद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर सरांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आई - वडीलांचे ऋण फेडावे अशी शिकवण दिली. सर्वोदय विद्यालयाचे कलाशिक्षक नरेंद्र गुरव सर उपस्थित होते. यात साईनाथ पवार (प्रथम) दिनेश भिल (द्वितीय) अरविंद नाईक(तृतीय) तर उत्तेजणार्थ नागेश सोनवणे या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
सदरील कार्यक्रमात "स्वच्छता विषयक शपथ" माणक चौधरी यांनी दिली. स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रशाळेतील मुख्याध्यापक रामलाल पारधी सर, सहकारी शिक्षक दर्पण भामरे सर, उपशिक्षिका संगीता राणे, अनिता पाटील, रामनगर शाळेतील शिक्षक महेंद्र शिंपी सर यांनी अथक परिश्रम घेतले.सुत्रसंचालन रामलाल पारधी सर यांनी केले तर आभार दर्पण भामरे सर यांनी मानले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार