आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
🖋मद्रास पावरा शिरपूर तालुका प्रतिनिधी
शिरपूर (तालुका प्रतिनिधी):- शिरपूर येथे तहसीलदार मा.आबा महाजन नायब तहसीलदार मा.अधिकार पेढाकर यांच्या कार्यालया मार्फत आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी आयुक्त अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग आयुक्तांलय नाशिक, अमरावती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय औरंगाबाद, राजूर, नाशिक, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, यावल यांच्या शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनी वसतिगृह प्रवेश देण्यात यावा यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
खास बाब म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध तातडीने करण्यात यावी, शासकीय आदिवासी मुला-मुलीच्या वसतिगृह प्रवेश अर्ज भरण्यासाठी वेबसाईट तातडीने चालू करण्यासाठी अशा विविध समस्या संदर्भात निवेदन देण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हिम्मत दाभाडे, युवा विभागीय अध्यक्ष ऍड. दारासिंग पावरा, धुळे युवा ग्रामीण अध्यक्ष उमेश पावरा, पिटू पावरा, विशाल पावरा आदि पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार