गोपनीय अहवालाची दुय्यम प्रत मागणीसाठी सीईओ यांना प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




गोपाल गावित सर, जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना 

गोपाल गावित सर





नंदुरबार दि.१० (प्रतिनिधी) जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण साहेब यांना प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी गोपनिय अहवालाची दुय्यम प्रत मिळणेबाबत निवेदन सादर ई-मेल द्वारा पाठविण्यात आले आहे.


दरवर्षी केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षकांनी वर्षभर केलेल्या कार्याच्या मुल्यांकन गोपनिय अहवालाची नोंद केली जाते त्याची दुय्यम प्रत प्राथमिक शिक्षकांना देणे बंधनकारक आहे. परंतु सदर अहवालाची दुय्यम प्रत नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना देण्यात आलेली नाही. तरी जिल्हा परिषद सेवेत १२ वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या प्राथमिक शिक्षकांना चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी  गोपनिय अहवालाच्या दुय्यम प्रतीची आवश्यकता आहे. तरी आपण तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देवून नंदुरबार जिल्हा  प्राथमिक शिक्षकांना गोपनिय अहवालाची दुय्यम प्रत मिळवुन द्यावी.


तसेच गोपनिय अहवालाच्या दुय्यम प्रतीपासून जिल्ह्यातील एकही प्राथमिक शिक्षक वंचित राहणार नाही याची दक्षता घेणेत यावी, ही आग्रहाची नम्र विनंती करण्यात आली आहे. प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी सविनय सादर ना. बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, विकास घुगे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांना ई-मेल द्वारा पाठविण्यात आल्याची माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी दिली आहे.



Post a Comment

0 Comments

झाले