अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत 5 से.मी. सुट देण्यात यावी -ट्रायबल फोरम (Tribal Forum)

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Tribal-candidates-5-cm-in-physical-fitness-test-Should-be-exempted


नितीन तडवी ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष

अक्कलकुवा ( तालुका प्रतिनिधी ):- आज दिनांक 17/02/2022 रोजी ट्रायबल फोरम नंदुरबार तर्फे राज्य लोकसेवा आयोगा मार्फत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत  5 से.मी. सुट देण्यात यावी या संदर्भात मा.तहसीलदार साहेब अक्कलकुवा यांच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात आले.


Tribal-candidates-5-cm-in-physical-fitness-test-Should-be-exempted


निवेदनात म्हटले आहे कि, केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संघ लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरण्यात येणाऱ्या भारतीय पोलीस सेवा, भारतीय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स गट अ, आणि इतर केंद्रीय पोलीस सेवा अंतर्गत होणाऱ्या गट अ आणि गट ब च्या पदभरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणी मध्ये १६५ से.मी. उंची अनिवार्य केलेली आहे. परंतु, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवार पुरुषसाठी १६० से.मी. व महिलांसाठी १४५ से.मी. अशी दोघांनाही पात्रतेसाठी ५ से.मी. ची सूट दिलेली आहे. 




महाराष्ट्र राज्यात राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणाऱ्या पोलीस उपअधिक्षक / सहायक पोलीस आयुक्त, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक अधिकारी अशा विविध पदासाठी सुद्धा केंद्र सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर १६५ से मी उंची अनिवार्य केलेली आहे. 


मात्र संघ लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिलेली आहे. परंतु  राज्य लोकसेवा आयोगात तशी सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे थोड्याफार फरकाने अनुसूचित जमातीचे बहुतांश उमेदवार राज्य लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारया शारीरिक क्षमता चाचणीत अपात्र ठरतात.


संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्यात अनुसूचित जमाती उमेदवारांच्या बाबत शारिरीक चाचणीत उंची मध्ये ५ से.मी.ची स्पष्ट तफावत आहे. ही तफावत दूर करुन संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर, राज्य लोकसेवा आयोगातही अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पुरुष व महिला उमेदवारांना ५ से.मी.सूट देण्यात यावी ही नम्र विनंती. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्य सचिव यांना देण्यात आले.


यावेळी निवेदन देण्यासाठी ट्रायबल फोरमचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा. नितीन तडवी, जिल्हा महासचिव मा.दशरथ तडवी, जिल्हा कोषाध्यक्ष मा.वंसत वसावे, जिल्हा सचिव मा. रविंद्र वळवी, जिल्हा प्रसिद्धप्रमुख मा.महेश वळवी, तालुकाध्यक्ष सिमादादा तडवी, मनिष वसावे, अनिल वसावे, रवी पावरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments

झाले