आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल
नंदूरबार :- बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशिल युवक जागरूक शिक्षीत कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे. समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबनाचा स्विकार हि सर्वश्रेष्ठ गोष्ट असते. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त ,शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.
या संघटनेच्या नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुका अध्यक्ष पदी मा श्री प्रल्हाद सुकलाल पवार यांची निवड आज १६ फेब्रुवारी २०२२ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दसरथ मडावी साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल ( Birsa Kranti Dal ) संघटनेचे नंदूरबार जिल्हा अध्यक्ष मा.शिलेदार पावरा सर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. श्री डी. बी. अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव मा. चिंधू आढळ, राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रंगरावजी काळे साहेब, बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे सर, उपाध्यक्ष प्रा संजय मेमाणे सर कार्याध्यक्ष श्री हरिभाऊ तळपे, पुणे जिल्हा महासचिव किरण तळपे, सचिव मा. शशिकांत आढारी, खेड तालुका अध्यक्ष सुधीर भोमाळे कार्याध्यक्ष मा. संतोष भांगे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा .संतोष बोटे,दिंडोरी ता. अध्यक्ष मा. अशोक जाधव, अकोले तालुका अध्यक्ष विजय मेंगाळ, रायगड जि अध्यक्ष विनायक पारधी सर, आंबेगाव ता. सुरेश वाळकोळी, उपाध्यक्ष मा सागर भवारी सर, नाशिक उपाध्यक्ष मा. किशोर माळी, पेठ तालुका अध्यक्ष मा .मधुकर पाडवी, येवला तालुका अध्यक्ष मा, विजय माळी, नांदगाव तालुका अध्यक्ष मा. हिरालाल देशमुख, शंकर वासले, चाकण शहर अध्यक्ष मा .बारकू ठोकळ, संघटक आनंता मेठल, इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार