पेसा अंतर्गत गावातील शासकीय कर्मचारी हे आदिवासीच (अनुसूचित जमाती) असले पाहिजेत -बिरसा क्रांती दलाची मागणी ( Birsa Kranti Dal )

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Under-PESA,-village-government-employees-must-be-tribals-Birsa-Kranti-Dal-demands


✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी):- पेसा अंतर्गत ( Pesa Act ) गावातील शासकीय कर्मचारी हे आदिवासीच ( Adivasi ) असले पाहिजेत अशी मागणी आज दि. १८/०२/२०२२ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेच्या ( Birsa Kranti Dal ) वतीने विधानसभा उपाध्यक्ष मा.श्री. नरहारी झिरवाळ साहेब यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, कुठल्याही कामा निमित्ताने कार्यालयात गेल्यावर नागरिकांना या कक्षातून त्या कक्षात सारखे फिरावे लागते अधिकारी जागेवर नसणे, कर्मचारी दुसऱ्या कक्षात असणे, हा अनुभव लोकांना नित्यनेमाने येत असतो. त्यामुळे नागरिकांच्या ज्या गावात पेसा कायदा लागू आहे. त्या ठिकाणी कर्मचारी हा निवासी असला पाहिजे म्हणजे कुठलेही विकास काम करताना अडथळा येणार नाही. गावातील विकास व्हायला वेळ लागणार नाही. 


पेसा अंतर्गत येणारा शासकीय निधी पुर्णपणे त्या गावात खर्च होऊन तेथील जनतेचा विकास होईल व खऱ्या अर्थाने पेसा कायद्याची अंमलबजावणी होऊन शेवटच्या घटकांपर्यंत न्याय मिळेल व संपूर्ण गाव विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे ( Birsa Kranti Dal ) दिंडोरी तालुका अध्यक्ष मा.अशोक जाधव, उपाध्यक्ष शंकर वासले, कार्याध्यक्ष भीमराव चव्हाण, यशवंत साबळे, बबन गवळी, बबन पारधी, नंदू खराटे सोमनाथ वाघेरे, विलास मोरे, सुभाष बागुल, किरण गांगोडे, गोकुळ लोखंडे, चंद्रकांत पवार, पिंटू खराटे, चंदर खराटे व इतर बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले