चंद्रपूर येथे मा.दशरथ मडावी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बिरसा क्रांती दलाची ( Birsa Kranti Dal ) बैठक संपन्न

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)


Meeting-of-Birsa-Kranti-Dal-held-at-Chandrapur

✍️मा. चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र राज्य सचिव बिरसा क्रांती दल

चंद्रपूर ( जिल्हा प्रतिनिधी ):- बिरसा क्रांती दल इंदिरानगर चंद्रपूर येथे मा.दशरथ मडावी साहेब संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांचे प्रमुख उपस्थिती सभा संपन्न झाली. 


समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी ,अस्तित्व, अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल ( Birsa Kranti Dal ) या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.

 

Meeting-of-Birsa-Kranti-Dal-held-at-Chandrapur


यावेळी बिरसा क्रांती दल ( Birsa Kranti Dal ), महिला फोरम च्या राज्य अध्यक्ष मा.गिरीजा उईके, बिरसा क्रांती दलाचे राज्य संघटक या.व्ही.डी.कोवे, विदर्भ संघटक अतुल कोवे, जितेश कुडमेथे इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला फोरम व बिरसा क्रांती दलाचे सर्व सदस्य व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

झाले