आधुनिक गोंडवानाचे महानायक आचार्य मोतिरावेन कंगाली व लिंगो दर्शन..

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




डॉ  प्रकाश वट्टी ✍️.. 


भाषा हे संदेश वहनाचे साधन आहे. भाषेमुळे आपल्या  भावभावना अभिव्यक्त करता येतात.  तसेच भाषा हे साहित्याचे मूलद्रव्य आहे.भाषा हे साहित्य साधन व माध्यम ठरते जेव्हा भाषा ही साहित्यातून अभिव्यक्त होते तेव्हा साधन म्हणून पाहिले जाते तर भाषा ही साहित्याची भूमिका पार पाडत असते त्यवेळी माध्यम म्हणून कार्य करते. आणि म्हणून  साहित्य हे समाजाचा आरसा समजला जातो. समाजाचे प्रतिबिंब हे आरसा रूपातून साहित्यात पाहिले जाते. त्यामुळे साहित्य हेच समाजाचे प्रभावी  अंग नव्हे तर हृदय मानले जाते. त्यामुळे साहित्य हेच समाजाला दिशा देण्याचे अव्याहतपणे कार्य करते. साहित्य हे समाजाचे जिंवतपणाचे लक्षण  समजले जातं आजपर्यंत जे काही समाजात चळवळ, सभा संमेलन  व जागृती घडून आल्या त्याची मुख्य प्रेरणा हे साहित्य हेच राहिले आहे.  आणि म्हणून साहित्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. असे एका विचारवंताने म्हटले आहे. की, एके काळी युरोप देशात विद्यापीठात अचानक आग लागली असता त्याने प्रथम माणसे वाचविली नाही तर प्रथम साहित्य वाचविले.त्यामुळे पाश्चिमात्य देशांतून अनेक विचारवंत उभे आहेत. नव्हे देशाची सत्ताच विचारधारा ठरविते.हीच विचारसरणी घेऊन अनेक देशाची राज्य व्यवस्था चालू आहे. ही प्रेरणा आज घेतली समजून घेतली तर गोंडवानाचा प्राचीन इतिहास त्यांची सभ्यता आणि  रूढी परंपरा तसेच प्राचीन सभ्यता असलेली हडप्पन सैंधवीलिपीचे जगात प्रथमतः उद् वाचन करून गोंडी लिपी असल्याचे जगाला सांगितले. एवढेच नव्हे तर पारी कुपार लिंगो गोंडी पुनेम दर्शन या ग्रंथाची निर्मिती करून लिंगोची तात्विक बैठक आणि गणव्यस्थेचे अनोखे दर्शन समाजाला करून दिले आहे. 


जगात  गोंडी व्यवस्था ही गोंदोलाची जिवण जगण्याची आदर्श व्यवस्था आहे तसेच मुंजोक सिंध्दात सागून अंहिसातत्वाचे बीजरोपणाची ती केद्रबिंदू आहे. आद्य प्रेरणा आहे ही बाब लक्षात आणून दिले. तसेच याच ग्रंथात पुन्हा गोंडी पुनेम, गोटूल दर्शन , गोंडी पुनेम सर्वकल्याणवादी दर्शन, सर्वसाधारण नीतीबोध, सण ,उत्सव ,तीज त्यौहार , गोंडी पुनेम ध्वज दर्शन आणि गोंडी संहिता सांगितले आहे हे लक्षात घेतले असता गोंडवाना सगात वैचारिक जागृतीची मशाल खरं तर आचार्य मोतिरावन कंगाली यांच्या साहित्य निर्मितीने झालेली आहे. पिवळ्या क्रांतीचे वादळ याचे मुख्य प्रर्वतक कंगाली साहेब आहेत ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे.  त्याचप्रमाणे आचार्य कंगाली दादा यांनी  या व्यतिरिक्त  समाजात प्रबोधन करतांना  गोंडवाना का सांस्कृतिक इतिहास सैंधवी लिपीचे गोंडीभाषेत वाचन decipherment of indus script in Gondi ह्या मौलिक ग्रथाला जन्म दिला. यातून गोंडवाना राजपाठ बाबींचा इतिहा स जाणून घेता आला. ही तेवढीच  गोंडी संस्कृती सभ्यता करिता गौरवाची बाजू आहे. नव्हे नव्या पिढीला संशोधन करण्याची प्रेरणा  , नवचेतना जागृत  केला  आहे.याशिवाय त्यांनी  16 ग्रंथाची निर्मिती करून गोंडवानाचा मृतप्राय इतिहास संशोधन व अभ्यासाने गोंडवानाच्या पुढील शिलेदार यांच्या हातात ठेवला आणि  गोंडीयन सगाची अस्तित्व व अस्मिता जागृत केली हे कार्य अव्दितिय व अजोडपूर्व आहेत. एवढेच नव्हे तर भाषेची कास धरली गोंडी करियाट ह्या शब्दकोष ग्रंथाची निर्मिती करून भाषेला पुर्नजिवित करण्याचे कार्य हे साधारण नसून सामाजिक बांधिलकी जपणारी बीजारोपणाची प्रक्रिया आहे. हा समाजाला संदेश दिला.  


दादा मोतिरावेन कंगाली हे एक व्यक्ती म्हणून पाहतांना अतिशय साधी राहणी उच्च विद्याविभूषित होते. तसेच ते  समाजशास्री भाषाशास्त्री व एक उत्तम संशोधक होते. त्यामुळे गोंड गोंडवाना सभ्यतेचा इतिहास उजागर करणारे आधुनिक गोंडवाना निर्मिती करणारे महानायक व शिल्पकार ठरले.  नाहीतर हा गोंडवाना गणतंत्र व्यवस्था राजसत्ता , भव्यदिव्ये अजोड गोंडवाना दर्शन हे इतिहास बाह्य झाले असते आणि  आपला इतिहास विसरून समाज हा सुध्दा काळाच्या पदड्याआड झालं असतं परंतु दादा मोतिराम कंगाली  यांचा जन्म हाच गोंडवाना संस्कृतीची पुर्नदेण आहे. त्यामुळे आज आपण ज्यांनी गोंड गोंडवानाचा इतिहास आपल्या कौशल्य चातुर्याने शोधून काढला समाजाची अस्मिता जागृत केली त्यामुळे ह्या महान संशोधकाला सेवा जोहार करण्याचा संकल्प करूया आणि  गोंडी साहित्यात प्रचंड प्रमाणात साहित्याची निर्मिती करून मानाचे स्थान प्राप्त करून देणारे दिशादर्शक गोंडवानाचे निर्माते आहेत त्यामुळे त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी हा दिवस केवळ जंयती रूपात न ठेवता ह्या दिनाचे औचित्य साधून गोंडीभाषा दिन साजरा करावेत तरच दादा कंगाली साहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्णतत्वास जातील . 


त्यांनी जे सांगितलेला गोंडवानाचा इतिहास ह्या बाबींवर प्रकर्षाने विवेचन केले आहे. ते याप्रमाणेच भौगोलिक दृष्टिकोनातून जगातील  नऊ खंडाचा अभ्यास केला तर असे स्पष्ट होते.की, सयुंग खंडाना गण्डोदीप उन्डे नालुंग खंडना  अण्डोदीप  म्हणजे सयुंग खंडाना गण्डोदीप हा शब्द चिंतन करणारा आहे. याचा मराठीत आशय पाहता  हा गोंडी भाषेतील शब्द असून तो पाच संख्या दर्शक शब्द असून समुहवाचक आहे. याचा अर्थ असा की,पाच खंडाचे गण्डोदीप होता त्याचे प्राचीन नाव हे सिंगारदीप असे होते. त्यालाच कोयमुर्रीदीप यानावाने सुध्दा ऋगवेदात ऋचा 2/24/7 भागात कुयव अशी  मध्ये नोंद आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे. हे गण्डोदीप ,सिंगारदीप व कोयमुर्रीदीप हे तीन संकल्पनाचे विश्लेषण करणे यासाठी अगत्याचे वाटते. की, प्राचीन काळात यादेशात गोंदोला एक सभ्यता होती. तीने आपले स्वतंत्र व्यवस्था सर्व प्रथम नर्मदा घाटी खो-यात आज पासून जवळजवळ इ.स.पुर्व 10,000 हजार वर्षापूर्वी  निर्माण केलं होतं सर्वात प्रथम मानवी जीवजगत सृष्टीचे दर्शन गण्डोदीप भागात म्हणजे दक्षिण गोलार्धातील नर्मदा    घाटी सभ्यता येथे झाले होते.आणि म्हणून नर+मादा ते नर्मदाअसे नामकरण  झाले. असे  संशोधकाचे मत आहे. तसेच तिरूमाय चंद्रलेखा कंगाली यांच्या गोंडवाना का पुनरूस्थान..या ग्रथांत सुध्दा पृष्ठ 6-7 मध्ये उल्लेख आहे.  भारत ही संकल्पना फार अलिकडील आहे. प्राचीन काळी हाच भारत  देशाचे प्राचीन नाव  कोयमुरी द्वीप हे होते या भूभागात राहणारा समाज म्हणजे कोयामुरी हा होय. कोयमुर्रीव्दिप हे नाव कोया माणसावरुन पडले हे काही  सिंध्दातांचा आधारे स्पष्ट झाले आहे. (संदर्भ  व्यंकटेश आत्राम याची गोंडी संस्कृतीचे संदर्भ)  म्हणजे हा सलग भूप्रदेश हा न कोयमुरी़व्दीप या नावाने ओळखले जात होता.


कोयममुरी म्हणजे  प्राचीन काळात कबिलाई व्यवस्था अस्तित्वात होती त्यामुळे या व्यवस्थेत टोळीने राहणारा समाज म्हणजे कोयामुरी मन्वाल कोया म्हणजे गुहेत, कोप, व कोया म्हणजे मोहफुलावर जिवन जगणारा समाज हाच त्याकाळातील कोयामुरीव्दीप खंडात राहणारा वर्तमान गोंड, पाटाहारी, कोलार, भिल्ल कोईतूर, थोडी, बुरड व कोरडी हा समाज तत्कालीन कोयामुरी येथिल समुह होय हा सलग एक कोयामुरीव्दीप अंतर्गत ओळखला जात असून हा  दुसऱ्या शब्दात  गण्डोव्दीप या प्राचीन नावाने ओळखला जात होता. मग  हा गोंडवाना  तेव्हा सलग एक भूभाग होता त्याचे तुकडे कसे झाले  यासाठी मित्रांनो (संदर्भ  आचार्य  मोतिरावेन कंगाल यांची गोंडवाना का सांस्कृतिक इतिहास  हा ग्रंथ वाचा) सलग गोंडवाना  होता हा प्राचीन काळात गण्डोव्दीप ह्या नावाने ओळखले जात असताना आर्याचे आक्रमक हा गोंडवाना खंडाला नव्हे तर गोंडी सभ्यतेला  हादरा देणारा बिंदू समजला जातो इथूनच गोंडी संस्कृती व गोंडवानाच्या अस्ताला सुरूवात झाली असे म्हटल्यास शंका नको. हा गोंडवाना  सलग असताना  गोंडाचे वैभवशाली परंपरा व राजपाठ होते हे गडमंडला व चांदागड येथिल गड किल्ले व दुर्ग यावरून लक्षात येते. हा गोंडवाना आर्याचे आक्रमन झाल्यानंतर अनेक वर्षे दीर्घकाळ संघर्ष सुरु राहिला त्यात अनार्य यांचा पराभव झाला  हा पराभव म्हणजे  रामायण  महाभारत प्राचीन युध्द होत. त्यात कोया माणसाले सामाजिक , राजकीय ,सांस्कृतिक  ऐतिहासिक व आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यात आले .हा माणुस दिवसेंदिवस पोटभरायला सुध्दा  कमकुवत होवून आर्याच्या वैचारिक प्रभावात आल्याने हा मानसिक गुलाम झाला. हा दुसरा टप्पा गोंडवाना  नष्ट होण्याला.


आता गोंडवानाचे राजपाठ हे आर्याचे लुटमारीचे केंद्र बिंदू ठरल्याने  गोंडवानातील हरेक माणुस हतबल व दुर्लब झाल्याने एकच धोरण सुरु केले गोंडवानाची ताकद कमजोर व भविष्यातही गोंडवाना चळवळ कधीच जोर धरू नये म्हणून  वेगवेगळ्या  राज्यात विभागणी करून एक सलग समाजाला वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा त रचना करुन जाती पोटजातीत रुपांतरीत केले. त्यानुसार धर्म जात विसरून  हिंदुकरणाचा सपाटा हाच गोंडवाना राज्याला हादरा... हाच हादरा गोंडी संस्कृती व धर्म भाषा नष्ट करण्यासाठी इथूनच प्रयत्न केले गेले.       पुढे स्वातंत्र्यानंतर आदिवासी  समाज या नावाने ओळखले जायचा याची समाजात  अतिमागास म्हणून संविधान नोंद केली गेली मात्र या समाजाला प्रस्थापितांकडून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी कधीच प्रयत्न केले गेले नाही   उलट कायमचा पंगू केले मित्रांनो हे काळ म्हणजे  गोंडवानाचा अस्त होय. जो उरला ...सुरला होता तो त्याला संपविण्यासाठी राजकीय व काही समाजकंटकानी खुप प्रयत्न  केला ते यशस्वी झाले  आम्ही  गुलाम झालो जो समाज दोन वेळच्या  पोटाची खळगी भागवू शकत नाही . तो समाज आपली संस्कृती व धर्म वाचविण्यासाठी  खरच प्रयत्न करणार काय? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे? यावर चिंतन करावे. तिसरे असे की, तर ह्या समाजाला हिंदुकरण करण्यासाठी सर्व राजकीय सताधिस सरसावले असतांना  गोंडवाना हा पूर्णतः भुईसपाट  होण्याच्या अंतिम चरणावर असतांनाच पुनेमी मार्ग दाखविण्यासाठी अशा महान गोडीयन सगात ज्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील दुलारा या गावात छतिराम व रातयार यांच्या पोटी महान विचारवंत , संशोधक, भाषाशास्त्री व गोंडीपुनेम दार्शनिक मोतिरावेन कंगाली यांचा जन्म झाला. ज्यानी शैक्षणीक वर्तुळात आपले नाव  कोरले नागपूर विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर व संशोधनाची पदवी संपादन करून  ते भारतातील प्राचीन गोंडी संस्कृती किती सभ्य व वैभवशाली होती हे सिध्द करण्यासाठी आपले आयुष्य गोंडवाना  चळवळीत झोकुन दिले.आणि सांगितले कि, हि हडप्पा व मोहेनजोडदो संस्कृतीचे  पाईक हे प्राचीन गोंडवानातील कोया माणुस आहे .


तसेच गोंडवाना  किती वैभवशाली होता हे त्यांच्या  गोंडवाना का सांस्कृतिक इतिहास या ग्रंथातून स्पष्ट होते.  जो समाज  आपले अस्तित्व विसरतो  तो समाज नष्ट झाल्याशिवाय राहत नाही हे निक्षून सांगितले  व समाजाला एकतेच्या धाग्यात शिवतांना पुनेम हा मार्ग सागितला. आहे हे सांगण्यासाठी गोंडी पुनेम या अप्रतिम आणि पवित्र ग्रंथांची रचना करून  मरणावस्थेतील आशा पल्लवित झाल्या ते कंगाली दादामुळे  आज दादा नाहीत  हे पिवळे वादळ भारतात उठले त्याचे श्रेय दादानाच आहे .एवढेच नव्हे तर गोंडवाना  समग्र क्रांतीचे दिशादर्शक दादा हिरासिंग मरकाम व मोतिरावेन कंगाली हेच आहेत  त्यानंतर सोबत याचळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी सुन्हेरसिंग ताराम यांनी गोंडवाना दर्शन हे मासिक काढले.आणि  स्वतंत्र राजकीय व्यासपीठ म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टी अस्तित्वात आली ही गर्दी आज पाहण्यासाठी दादा आज आपण नाहित परंतु आपण दाखविलेला मार्ग हा आम्ही पुढे घेऊन जाणे हे प्रत्येक गोंडीयन सगाची जबाबदारी आहे. हे पिवळे वादळ संपूर्ण भारतात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे रूपात घराघरात प्रत्येक माणसापर्यत पोहचविणे हे आपल्या सगाची जबाबदारी आहे.हे  गोंडवानारत्न दादा हिरानी कार्य केले हे अपुरे मिशन पुढे घेऊन जाण्याचे काम आपले आहे. नव्हे तर पुनेम रूपात पोहचविणे हा मार्ग आहे.हे सांगितले ती जबाबदारी घेऊन सगानी वैचारिक दृष्टिकोन बदलविणे आवश्यक आहे तरच  दादांच्या   विचारांचा जय जय कार होईल असे स्वप्न बाळगतो आचार्य मोतिरावेन कंगाली यांच्या जंयती निमित्तानं तसेच गोंडीभाषा दिन प्रसंगी सर्व सगाना शुभेच्छा! ही जंयती ऐतिहासिक व्हावी अशी अपेक्षा बाळगतो.... जय सेवा... जय गोंडवाना  डॉ प्रकाश वट्टी 

Post a Comment

0 Comments

झाले