आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
भुराटोला येथे राणीदुर्गावती मुर्ती स्थापणा दिनी समाज प्रबोधन मेळाव्याचे अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांचे प्रतिपादन
तिरोडा:(१०) शहीद राणी दुर्गावती मडावीचे गोंडवाणा राज्यात स्त्री हक्क अधिकारांसह व त्यांचे संरक्षणासाठी लढा देत ती अवघ्या ४० वर्षात अजरामर झाली असे सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी भुराटोला येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रतिपादन समाज प्रबोधना प्रसंगी केले.
यावेळी संस्कार पीठा - वर उद्घाटक पवन पटले जिल्हा परिषद सदस्य व ध्वजारोहक एस जी उईके जनरल सेक्रेटरी विदर्भ, प्रा.देवेद्र खंडाते विदर्भ संरक्षक, भोजराज उईके जिल्हा अध्यक्ष, वसंता मडावी संपर्क प्रमुख तह. तिरोडा, विनोद उईके महासचिव, ता. दिलीपकुमार कोकोडे तालुका सल्लागार, उपसरपंच पालडोंगरी, नियुक्त त.सहकार्याध्यक्ष सलीराम मरस्कोल्हे, पाहुने प्रमुख बिरसा फायटर्स, अतिथी व ग्राम पंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष सुरेशकुमार पंधरेनी पुढे बोलतांनी सांगितले की, आपण ज्या भूभागात राहतो त्या गोंडवाणा प्रांताचे अधिकृत गोंडराज्याचे सामाज्य एका सक्षम राणी दुर्गावती ने चालवून दाखविले. ते क्षत्रिय कुलवंशाची असतांना नागवंशीय पराक्रमी राजकुमार दलपत शहा मडावी यांचे सोबत प्रेमबंधनात आंतर जातीय लग्न करणे स्वीकारले व जातीपातीच्या श्रृंखला तोडून अख्खा स्री जातीला प्रेमाने जग जिंकता येते हे दाखवून दिले.
४० वर्ष आयुष्यात अखेरची लढाई करीत गढा मंडलाची राणी म्हणून उदयास आली तिच्या पराक्रमी व संयमी, शौर्य, चातुर्याची चर्चा जगविख्यात आहे असे सांगुन जातिभेद नष्ट करून प्रेमाची महती प्रेमविर जगाला करून दिली, असं जीवन चरित्र क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व अन्य मातामध्ये पाहायला मिळतं तसे जीवन इतर आदिवासी भगिनींनी शत्रुवर विजय मिळवुन प्रसिध्दी मिळवावी व समाज व राज्य ते गावाचं रक्षण करावे तरच समग्र भारत व निर्भय देश निर्माण होईल. सरतेशेवटी स्ञीचा संमान केला पाहीजे तरच "बेटी बचाव व बेटी पढाव " ला महत्व येईल.
देशाच्या राजकीय सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लोकशाहीच्या पदाधिकारी व नवनियुक्त इसमांनी आकलन, अनुकरण केल्यास विश्वाच्या पटलावर बिरसा, मुंडा विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्य सम्राट, संग्रामशहा मडावी बाबुराव शेडमाके, सारख्यांचे विचाराची गरज आज आहे व त्यांचे गुण व घेवून समाजाने वास्तिक जीवनात अंगिकारावे असे प्रतिपादन केले.
प्रबोधनात भुमक दिनेश मडावींनी राणी दुर्गावती व बिरसाच्या जीवनावर प्रखरतेने प्रकाश टाकून समाजाला गतिमान विकास व उन्नत समाज संघटनाची गरज आहे. अस सांगत आदिवासी निसर्गपुजक आहे त्याला धर्म कोडाची गरज असून आरक्षण व संरक्षण विषयावर मत व्यक्त केले.
तसेच प्रास्ताविक पंधरे यांनी तर संचालन संजय मडावी सर, आभार सहकार्याध्यक्ष सलीराम मरस्कोल्हे यांनी केले.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार