आदिवासी समुहाने आध्यात्मिक बळ प्राप्तीसाठी आदिवासी धर्म व संस्कृती अवलंबल्यास निर्भय समाजाची निर्मिती शक्य - सुरेशकुमार पंधरे

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)




गोंडवाणा क्रांतीवीर राणी दुर्गावती व बिरसा मुंडाच्या विचारांचा आदर्श उलगुलानातून कार्यकर्त्यांनी बोध  घेण्याची गरज - बिरसा फायटर्स 

प्रबोधन अध्यक्षीय भाषणातून शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा क्रांतिकारी दहाड गुलामीची श्रंखला तोडेल - सुरेशकुमार पंधरे 


एसके जी पंधरे विदर्भ ब्युरो चिफ, राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार 

तिरोडा ( ११ फेब्रुवारी ):- नृत्य व गोंडी संस्कृती परंपरेच्यानुसार भुराटोला येथे रॅली काढून त्याचे रूपांतर नंतर शहिदाच्या प्रतिकृतिंना माल्यार्पण करून मान्यवरांचे हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. राणी दुर्गावती व धरती आबा बिरसा मुंडाचे क्रांतीकारी जग- विख्यात लढा आत्मसंम्मान, देशा भिमान होता त्याचे जनजाती समूहाने विचार आत्मसात करा. 




खऱ्या इतिहासकारांनी मांडलेले तत्वज्ञान जगाला देण्याचे काम करावे असा तिरोडा येथे दि.१०/२/२२ प्रबोधनात्मक सल्ला साहित्यिक, समाजसुधारक प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्स विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुरेशकुमार पंधरेंनी पदाधिकारी व श्रोत्यांस दिला. 


यवेळी संस्कारपीठा वर झेंडाध्वजरोहक मा. एस जी उईके, महासचिव विदर्भ, उद्घाटक पवन पटले जि.सदस्य तर जिल्हा अध्यक्ष भोजराज उईके, श्री वसंता मडावी सं ता प्रमुख, श्री.चंद्रकुमार चौधरी सरपंच, विनोदजी उईके, ता महासचिव, उपसरपंच चंद्रकांतजी साबळे वच्छला मरस्कोल्हे, सर्वश्री ग्रामपंचायत सदस्य, दिलीपजी रहांगडाले, श्री इंद्रजित मानकर, श्री संजयजी मडावी सर, मदनलाल पंधरे उपस्थित होते.




अध्यक्ष पंधरेनी आपल्या प्रबोधन  भाषणात क्रांतीकारांच्या गळ्याभोवती फास व आवळल्या जातो त्रास जाणवू नये म्हणून तेव्हा धर्म हे श्रध्दा ते सहन करण्याचे बळ देतो, क्रांतिकारक वादळ आणि तुफानामध्ये स्वत: सिध्द करण्यासाठी प्रतिक्षा पाहत नाहीत. जुल्मी सत्ताधाऱ्यांना धैर्याने तोंड देतात. धर्म हा वीरांच्या हातातील शस्त्र बाहुले आहेत. सभोवार आकलन करण्याबाबत मनोधर्य, स्वंय मानवाची जिवाची असमर्थता, संस्था व संघटणाच्या अर्थजीवन प्रक्रीयेवर ताबा मिळवून मर्यादांवर मात करणे, सर्वांची परिणीती म्हणजे धर्म होय.


जगात विकट परिस्थीती संकटाला तोंड देतांना खंबीरपणे मुकाबला करताना भरभराटी व समृध्दीच्या काळात मानसाच्या बेताल वर्तनाला लगाम घालण्यास जे ईश्वराचे काल्पनिक अस्तित्वाचे जाळे निर्माण केल आहे. त्या श्रध्देमुळे कष्टाची तीव्रता कमी होते. तेव्हा जीवनास सुखद बनविले जाते. धर्म हा गांजलेल्या दडपलेल्या प्राणी जीवाचा निश्वास आहे, त्यास धर्म म्हणतात. असेही धर्मात तळमळ यातना असतात. पाषाणवत चैतन्यरहित जगाचा आत्मा असतो. तिरलोकांना गुंफणारी अफु आहे धार्मिक जीवणात खोटे भ्रामक, सुखसमाधान लाभत नसतो. क्रांतीवीरानी अशा धर्म व्यवस्थेला नाश करण्याची हाक देताना मागणी केली. मनुस्मृतीत ते शक्य नाही आपण त्याचे बळी जातो हेच अशिक्षित पणाने आज वर दिसुन आले आहे. असेही बिरसा फायटर्सच्या मेळाव्यात नियमात सत्रात सांगितले आहे. 


कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक बिरसा फायटर्स संघ भुराटोला, इंद्रकुमार टेकाम, अध्यक्ष दिलीप कोकोडे सल्लागार तालु. तिरोडा सलिराम मरस्कोल्हे, सह कार्याध्यक्ष दिनेश उईके-सचिव, प्रताप मडावी, सहसचिव, राज कुमार भलावी नरेशजी मडावी, दिलीप उईके, प्रस्ताविक संचालक  मदनलाल पंधरे, संचालन संजय मडावी सर तर आभार इंद्रकुमार टेकाम यांनी केले.


सायंकाळी ७ वाजेला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.



Post a Comment

0 Comments

झाले