कोडीद व चाकडू ता शिरपूर जि धुळे येथे "जन अभियान कार्यक्रम-२" या मोहिमेद्वारे कोवीड महालसीकरण मोहीम

 आदिवासी युवा (adiwasiyuva.com)



आज कोवीड-१९ लसीकरण सेशन घेण्यात आले.

प्रतिनिधी-गणेश खर्डे मलगाव बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पत्रकार संघ

शिरपूर:- कोडीद उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या चाकडू व कोडीद ग्रामपंचायतील व परिसरातील गावातील नागरिकांसाठी Covid Vaccination कोविड-१९ लसीकरण शिबिर आज १५ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय, कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र बागुल सर, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.भरत पावरा ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले.

    


लसीकरण नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र कोडीद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आरोग्य अधिकारी डॉ.निलेश भिलाला व टीम, आरोग्य सेविका सौ.प्रमिला गिरासे ह्यांनी केले.

    


प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील श्री.भरत पावरा, ग्रामविकास अधिकारी श्री.एस.सुर्यवंशी व ग्रामपंचायत कर्मचारी व शालेय शिक्षक व स्टाफ, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, गावकरी उपस्थित उपस्थित होते. 


ह्यावेळी एकूण १२० लाभार्थ्यांनी कोवीड लसीकरण करून घेतले. उपस्थितांचे डॉ.हिरा पावरा ह्यांनी सगळ्यांचे आभार मानले.



Post a Comment

0 Comments

झाले