आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
लतादिदी म्हणजे संगीत प्रेमींसाठी संगीत सम्राज्ञीच्या शब्दसुरातून आखोमे भरलो पाणी अनंतात विलीन -बिरसा फायटर्स विदर्भ
एसके जी पंधरे :राज्य पञकार प्रतिनिधी
मुंबई:-(६फेब्रुवारी) भारताची गान कोकिळा लता दिदी म्हणजे सुरांचे विश्वच ते शब्द व संगीत सुध्दा विनेच तार तुटून पडावे तसे तिचे प्राणरूपी श्वास बंद पडले. म्हणजे निधन। हिच बातमी गहिवरनारीच म्हणावे लागेल. त्यांनी वयाच्या ९२ व्यावर्षी अखेर श्वास घेतला आहे. हे अलगद शब्द मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
प्रतित समदानी म्हणाले, आम्हाला सांगण्यास अतीव दु:ख होतयं आज सकाळी 08.12 मिनिटांनी निधन झालं आहे. लतादिदींच्या शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे प्राण निघून गेले आहे.
काल जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती स्थीर झाल्यानंतर पुन्हा बिघडली होती. सुरवातीला कोरोणा व न्युमोनियाने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांची काही दिवसांनी आरोग्य गंभीर जनक असल्याचे वृत्त मिळताच त्यांना व्हेंटिलेटरवर हलविण्यात आलं होत.
८ जाने-२२ रोजी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केल्या नंतर प्रकृती बरी होण्याचे चिन्ह नसल्याने अतिदक्षता कक्षात त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलविण्यात आलं तेव्हा पासुन लता दिदीना 24 तास डाक्टरांच्या पथकांच्या निगराणीत आय.सी.यु. मध्ये ठेवण्यात आलं.
शनिवारी डाॅक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर प्रतिसाद देत होत्या, मात्र आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी जशी प्राणपक्षी उडून जावेत अशी प्रसार माध्यम व सार्व देशवासींसाठी धडकी भरणारी व मंगेशकर कुटुंबियासाठी एक रत्न निखडून पडला अशी साहित्यिक व विचारवंतासाठी बातमी आली.

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार