आदिवासी युवा (adiwasiyuva.com)
जन्मजात निसर्ग संस्कृती टिकविणे आदिवासी बांधवांच्या साहित्याचा आरसा आहे -निर्मलकुमार पंधरे
एसके जी पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्व-राज्य पत्रकार सदस्य
भंडारा :- (फेब्रु १७ ) आज आपल्यात मतलबी धर्मांध शक्तीचा सर्वत्र सावळा गोंधळ माजला आहे. अशात म्हणुनच देशात राजकीय इच्छा शक्तीने धर्म धोक्यात आहे म्हणुन अधर्माच्या मार्गावर सर्वच तमाशा सुरू आहे. धर्माची घरवापसी बिरसा मुंडाने केली होती घरवापसी असो की सुखद आनंद देणारी गोष्ट कुणी मंदिर, चर्च तर मस्जिद, विहार अशा मार्गावर आणण्यासाठी निसर्गपुजक समुह (आदिवासी) चा वापर करतांनी दिसतो.
निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा मानव खरा इतिहासाचे पोवाळे गातो. कारण त्याचेवर होणारे संस्कार, शिक्षण, संघर्ष हे संघर्ष करण्यासाठी जागृत होत आहे. आणि आदिवासी धर्माच्या नावाने एका संघटनांच्या रेषेतील जमात एकत्र येत आहे तर नवल नको. असे जर ध्येयधोरण नसेल तर पक्षमुक्त व्हाव लागेल व शोषन, दमनावर आधारित सर्व धर्म राजकीय पक्षांना सोडून आपल्या घरी परत यावे असे मला वाटत आहे.
निसर्गावर आधारीत श्रम आधारीत संस्कृती, सहकारा वर आधारीत आदिवासी संस्कृती आपली वाट पाहत आहे.
आज देशात बिरसा फायटर्स व आमचे सारखे अनेक आदिवासी समाजसेवक देशपातळीवर भिन्न भिन्न आदिवासींचे प्रश्न, सोडवून समाजाचा विकास साधण्यासाठी तत्पर व कार्यरत आहोत.
साहित्य क्षेञातील आदिवासी व साहित्य चळवळ अस्मिता, अस्मितेचा आपला ठसा उमटवून गतीमान होण्याची धडपड सुरू आहे. देशात हिंदी, मराठी, इंग्रजी, आदिवासी बोलीभाषेतील आदिवासी साहित्यिअक साहित्य लिहित आहेत. या साहित्यातून आदिवासी अस्तित्व, आत्मसंम्मान अस्मिता, शिक्षण, संस्कृती, इतिहास, स्वावलंबन आणि विकास इत्यादी अंगाने आपल्या धारदार लेखनीने आदिवासी साहित्यिक आदिवासी साहित्य लिहित आहेत.
मुळनिवासी म्हणुन सुध्दा दहाड़ करीत आहोत. आदिवासी मुळ- नावात काय दडलंय ते शोधलेले पाहीजेत. आदिवासींनी लिहिलेल्या साहित्यात आदिवासी जीवना च्या अनुभुतीवर आधारितभावना प्रकट होणाऱ्या साहित्यास आदिवासी साहित्य म्हटले पाहीजेत.
आदिवासी जनसमुदाय, धर्मपुर्व जनसमुदाय असला तरी तद्नंतर आदिवासी समाजाला धर्माने प्रभावित केले आहे हेच सत्य दिसत आहे. धर्माच्या प्रभावाने लिहिलेल्या साहित्यास आदिवासी साहित्य म्हणता कामा नये. धर्माने प्रभावित आदिवासी साहित्य हे देवधर्माशी नातं जोडतो. आणि कर्ता करविता तोच.अशा प्रकार ची भावना समाजात रूजविली जाते. आणि निसर्गत: माणसाच्या कर्तव्याला नाकारले जाते. देव नामात धर्माशी जोडणाऱ्या माणसाच्या कष्टदायक साहित्याकडे वळणारच येणाऱ्या पुढील पिढीने नव्हेच साहित्यीक व विचार वंतानेच नाकारलेले बरे.
आदिवासीचे त्तवज्ञान निसर्गाचे तत्वज्ञान आहे. निसर्ग, विज्ञान ज्यांनी निसर्गाचे नियम शोधून काढले ते ते वैज्ञानिक ठरले. व म्हणुन आदिवासी साहित्याचा प्रेरक निसर्गच ठरू शकतो. श्रम, समुह, आणि सहकार्यावर आदिवासी संस्कॄतीला केंद्र मानुन निसर्ग नियम आत्मसात करून आदिवासी आपले जिवन जगत असतो. आदिवासी संष्कॄती समते वर आधारित आहे. आणि भोग वादी संस्कॄती, शोषन, दमन भेद, वर्चष्व व्यक्ती केंद्रित मुल्यांचा पुरस्कार करते. समर्थन करते. साहित्यिअक प्रबोधन करते. परिवर्तन घडविते. साहित्य जिवना चा आरसा आहे.नुसता आरसा नाही तर साहित्य जीवनाचे मुल्य जपते.
आदिवासी साहित्यात आदिवासी चळवळीविषयी सुसंवाद दिसून येत नाही. सुसंवादाचा अभाव जाणवतो. म्हणुन आदिवासी साहित्यात समज गैरसमज दिसून येते. अशा निर्मळ चळवळी घरा घरातून, निर्माण करून समाजात साहित्याचे विचार रूजविले पाहिजे. अशा चळवळींना निकोप बनविण्याची प्रत्येकाला गरज व प्रत्येकाने तसी जबाबदारी पाडली पाहीजेत. तरच समाजात नवीन उभारी येईल.
तॄर्तास इथपर्यंत पुढील भागात -वाचा व आपले मत, विचार व्हाट्सअप ने पाठवा माझा नंबर 9404283750 ✍️विचारवंत निर्मलकूमार पंधरे 🙏

0 Comments
जय आदिवासी
जय जोहार