शिवरायांनी स्थापण केलेले राज्य हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थाने लोक कल्याणकारी राज्य होते :- प्रदेश अध्यक्ष बिरसा फायटर्स निर्मलकुमार पंधरे

आदिवासी युवा (adiwasiyuva.com)





हिंदवी स्वराज्य हा शब्द धर्माशी निगडीत नाही तो भुगोल व्यक्त करणारा आहे... ( इतिहास लेख )


एसके जी.पंधरे-विदर्भ ब्युरो चिफ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ, सदस्य. 


साकोली / भंडारा:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ वी जंयतीच्या अनुसरून आपणही राज्यकर्ते होऊ शकतो. हा घट्ट आत्म‌विश्वास मराठी माणसाच्या मनात निर्माण करून हिंदवी स्वराज्य स्थापण करण्याचे मनसुबे पक्के करणारे बहुजन प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराज हे भारतवर्षाच्या अस्मितेचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. 


शिवकालीन कागजपत्रामध्ये आढळणारा  हिंदवी स्वराज्य हा शब्द आवर्जून वापरलेला शिलालेखात आहे हे त्रिवार सत्य आहे. या शब्दाचा अर्थ हिंदुस्थान म्हणजेच भारत देशातील लोकांनी स्थापन केलेले स्वतंत्रराज्य असा होतो. 'हिंदुस्थान 'ह्या शब्दापासून अरबी फारशी-उर्दु या भाषांच्या प्रभा‌वातून व्युत्पन्न झालेला "हिंदवी' हा शब्द आहे. व तो धर्माशी निगडीत नाही. तर त्याचा अर्थ भारताचा भुगोल व्यक्त कर्ता आहे उर्दु भाषेत ई किंवा वी हा प्रत्यय लावून एखाद्या गावाची किंवा देशाची नागरिकता दर्शविण्याची प्रथा आहे. उदाहरणार्थ लुधियानाचे शाहीर लुधियानवी, बदायुंचे शकिल बदायुनी, लखनऊचे लखनवी तसेच हिंद म्हणजेच भारताचे रहिवासी (इंडीयन) असलेले हिंदवी होय. 


तसेच अशा लोकांनी स्थापण केलेले ते हिंदवी स्वराज्य होय. जर हे केवळ हिंदुंचेच हे राज्य आहे. असे सुचवायचे असेल तर उर्दु/पारशी भाषेच्या व्याकरणानुसार हिंदवी या शब्दाऐवजी  बहुअर्थी हिंदुवाई हा शब्द प्रचारात आला असता, पेशव्याची  बहुअर्थी पेशवाई हा शब्द याच अर्थाचा असून तो उर्दु भाषेच्या प्रभावातून निष्पन्न झालेला आहे. काही लोक अज्ञानापोटी हिंदवी या शब्दा चा अर्थ हिंदुंचे राज्य असा घेतात. पण ते सारासार चुकीचे व तज्ञ, बुध्दीवादी साहित्यिकांचे मते म्हणजे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाला खुजे करण्याचा प्रयत्न होय. त्यांचे राज्य नुसते हिंदुचेच नव्हते. तसे असते तर स्वराज्य उभारणीत इतर धर्मियांनी मदत केली नसती. व ते सहभागी झाले नसते. त्यांचा स्विकार व विस्तार मोठ्या प्रमाणात झाला नसता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापण केलेले राज्य बहुजन व लोककल्याणकारी साम्राज्य होते. आजच्या राजकीय संदर्भात ते धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक दृष्ट्या बहुजन वादी रचलेले सुखकारक, व हितकारक राज्य होते.


छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत स्वराज्याची मुहूर्त रोवली व त्या स्वप्नांची संकल्पणा  स्वराज्य संकल्पणा शहाजी राजेंनी मांडली होती. तर राजमाता जिजाऊ यांनी त्यांची परिपूर्ती करण्याची प्रेरणा शिवरायांना दिली होती. आई वडिलांच्या प्रेरणा शिरोधार्त मानुन शिवरायांच्या स्वराज्याच्या उभारणीत ज्वलंत इतिहास आहे. ते राज्य हिंदू किंवा मराठ्यांचे नव्हते तर हिंदु, मुस्लिम, ख्रिस्ती, जैन, बौध्द, आदिवासी, ईसाई या प्रमुख धर्माच्या व्यतिरिक्त नाथ महानुभाव, वारकरी, शैव, वैष्णव, शाक्त इत्यादी संप्रदायांच्या उदात्त विचारांचा परिपाक असलेले होते. यात मराठ्यांच्यासोबतच कुणबी, माळी, धनगर, भंगी, तेली, चंभार, कोळी कातकरी गोंड, भिल्ल कोकणी, रामोशी इत्यादी अठरापगड जाती जमाती शुरवीर यौध्दांचा सहभाग होता.


राजे बहूजनांचे राजे होते हेच या लेखातून सांगावेसे वाटते.


जय हिंद ! जय महाराष्ट्र ।

लेखक-निर्मलकूमार पंधरे  

व्हाट्सअप नंबर:- 9404283750

Post a Comment

0 Comments

झाले